As the summer heats up, consumers are in a rush to buy maat for cooling water.
As the summer heats up, consumers are in a rush to buy maat for cooling water. esakal
नाशिक

Summer Season : गरिबांच्या फ्रीजची मागणी वाढली! नवनवीन आकाराच्या माठांची चलती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उष्णतेचा पारा वाढताच मातीचे माठ बाजारात विक्रीसाठी आले आहेत. लाल, काळा व पांढऱ्या रंगाचे माठ आपण ऐकले असतील पण कार्टूनच्या आकाराच्या माठांना चांगलीच मागणी असल्याचे दिसून येते. (Summer Season demand for fridge of poor increased Movement of newly shaped monasteries nashik news)

नाशिक शहरातील पंचवटी कारंजा या भागात माठ मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. एकाच ठिकाणी लाल, काळ्या रंगाचे आणि आता पांढऱ्या रंगाचे माठ मिळतात. पांढऱ्या रंगाच्या माठांचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी ‘फ्रीज’प्रमाणे पाणी थंडगार होते.

पण थोडा धक्का लागला तरी हे माठ फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे माठ खरेदी करताना काळजी घ्यावी. असे विक्रेते सांगतात. साधारणत: २८० ते ३०० रुपयांपासून पाच लिटर क्षमतेचे माठ मिळतात.

माठाभोवती बारदान गुंडाळून ठेवल्यास त्यातील पाणी लवकर थंड होते. हे पाणी आरोग्यासाठी चांगले असते. ग्रामीण भागात या स्वरूपाचे पाणी थंड करण्याचा प्रघात आहे. शहरातही माठांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येते.

कार्टून सारखे दिसणारे माठ हे २५० ते ३०० रुपयांना मिळतात. लहान मुलांना आकर्षण वाटावे यासाठी कार्टूनचे माठ तयार केले आहेत. लाल व काळ्या रंगाच्या माठांमध्ये अनेक प्रकार दिसून येतात. ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन माठांची निर्मिती करण्यात आली आहे.

पावसामुळे नुकसान

मार्च महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने माठांची विक्री झाली नाही. आता एप्रिलचे पहिले दहा दिवस संपले तरी पाऊस अजून सुरुच आहे. त्यामुळे माठ खरेदी करण्यासाठी ग्राहक पाहिजे त्या प्रमाणात येत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

रंगीबेरंगी माठांसह कार्टूनचे माठही तयार केले आहेत. दिसायला आकर्षक आणि टिकाऊ असलेले हे माठ ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचे विक्रेत्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT