In the Shalimar area around noon due to the heat of the sun, heat spread on the road. esakal
नाशिक

Summer Season : उन्हाच्या तडाख्याने शहरातील रस्ते निर्मनुष्य; तापमानाने गाठली चाळिशी, तीव्रता अधिक

सकाळ वृत्तसेवा

Summer Season : उन्हाच्या तडाख्याने नागरिक कासावीस झाले आहे. कामगार वर्ग सोडल्यास अधिक तर नागरिकांनी घरात राहणे पसंत केल्याने शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात उन्हाचे चटके अधिकच जाणवू लागले आहे. तापमानाने चाळिशी गाठली आहे. (Summer Season streets of city are deserted due to scorching sun Temperature reached 40 intensity more nashik news)

नागरिकांची उन्हाने लाहीलाही होत आहे. बाजारपेठांवर याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. रस्ते जणू आग ओकत असल्याची स्थिती आहे. अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई येथे उष्माघाताने अनेक जणांना प्राणास मुकावे लागल्याची घटना ताजी आहे.

कामगार वर्ग सोडल्यास अन्य नागरिकांकडून घराच्या बाहेर पडणे टाळले जात आहे. खूपच आवश्यकता असतानाच नागरिक बाहेर पडत असून उन्हापासून संरक्षणासाठी काळजी घेऊन नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे.

दिवसभर विशेषतः दुपारच्या सुमारास शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहे. शालिमार, शिवाजी रोड, सीबीएस, मुंबई आग्रा रोड असे सर्वच भागातील रस्ते ओस पडत आहे. इतकेच नाही तर दोन दिवसांवर सण असूनही नागरिक खरेदीसाठी बाजारात जाणे टाळत आहे.

त्याचा परिणाम बाजारपेठांवर झाला आहे. बाजारपेठेतील रस्त्यांवरही दुपारच्या सुमारास शुकशुकाट दिसून येत आहे. सायंकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्याचा काहीसा आधार व्यावसायिकांना मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे तर सध्या उन्हाने व्यावसायिकांना त्रस्त करून सोडले आहे. हवी तशा खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत नाही.

काँक्रिटीकरणाने उष्णतेत वाढ

कधीकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून शहराची ओळख होती. सध्या शहराचे तापमान चाळिशी पार होताना दिसत असल्याने उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत आहे. याचे विशेष कारण म्हणजे सर्वत्र काँक्रिटीकरण वाढले आहे. रस्ते देखील काँक्रिटचे झालेले आहेत.

जमिनीत पाणी मुरत नाही. काँक्रिट रस्ते प्रचंड तापले जात आहे. ऊन कमी झाले तरी देखील रस्ते लवकर थंड होत नसल्याने उष्णतेत प्रचंड वाढ होत आहे. त्याचा परिणाम होऊन तापमान वाढण्यास मदत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT