Summer Season esakal
नाशिक

Summer Season : मालेगावात ऊन-सावलीचा खेळ!

सकाळ वृत्तसेवा

Summer Season : शहर व परिसरात गेल्या आठवड्यापासून ऊन-सावलीचा खेळ सुरु आहे. पारा ३६ ते ३७ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर रविवारी पावसाने विश्रांती घेतली.

रविवारी पारा ३६ अंश सेल्सिअस एवढा होता. मालेगाव अन्‌ ऊन यांचे समीकरण झाले आहे. गेल्या काही वर्षापासून मार्च ते जून या कालावधीत तापमान ४० ते ४५ अंश सेल्सिअस दरम्यान असते. या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देखील पारा ३७ अंशावर गेलेला नाही.

अधूनमधून बेमोसमी पाऊस होत आहे. ऊन सावलीचा खेळ सुरु असल्यामुळे येथे संमिश्र वातावरण आहे. कडक ऊन पडत नसल्याने रसवंतीगृह, शीतपेयांची दुकाने, मसाले ताक, बर्फ गोळे, लस्सी, आइस्क्रीम, कुल्फी, लिंबू शिकंजी आदी विक्रेत्यांवर मोठा परिणाम होत आहे. (Summer Season temperature rising in Malegaon nashik news)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ऐन उन्हाळ्यात बेमोसमी पाऊस पडत असल्याने कांदा, आंबे, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान होत आहे.

शहरातील आठवड्याचे तापमान

तारीख तापमान

३ एप्रिल ३४.८

४ एप्रिल ३५.२

५ एप्रिल ३५.८

६ एप्रिल ३६.८

७ एप्रिल ३७.०

८ एप्रिल ३६.६

९ एप्रिल ३६.०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT