नाशिक

यंदा उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र राहणार कमी राहणार

CD
यंदा उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र राहणार कमी राहणार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : खानदेशात रब्बी किंवा उन्हाळ सोयाबीनची पेरणी यंदा कमी होणार आहे. पेरणी ११०० ते १२०० हेक्टरवर होवू शकते. पाऊस कमी राहिल्याने यंदा रब्बी किंवा उन्हाळ सोयाबीन पेरा कमी होवू शकतो. धुळे व नंदुरबारात रब्बी सोयाबीनची पेरणी फारशी केली जात नाही. या भागात कृत्रीम जलसाठाधारक सोयाबीनऐवजी भुईमुगास पसंती देतात. त्यात पाऊसमान कमी राहिल्याने जलसाठे मुबलक राहतील की नाही, अशी शंका आहे. पण, प्रतिकूल स्थितीतही अनेक शेतकरी सोयाबीनचे चांगले उत्पादन रब्बीत घेत आहेत. पाऊसमान कमी झाल्याने यंदा स्थिती बिकट राहील. नंदुरबार, धुळ्यातील पेरणी कमी राहील, असेही संकेत आहेत. सोयाबीनचे उत्पादन यंदा खरिपात कमी आले आहे. बऱ्यापैकी दर सध्या सोयाबीनला आहे. नंतरही दर टिकून राहतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. पेरणीच्या वेळेसही दर ४६०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. यामुळे सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली. परंतु कमी पावसाने उत्पादन कमी आले. सोयाबीनसह अन्य पिकांची पेरणीदेखील करावी लागेल. त्यात चारा पिकांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. यामुळे सोयाबीनची पेरणी कमी होईल, अशी स्थिती आहे. शाश्वत जलस्रोतांच्या क्षेत्रातच पेरा शक्य जळगाव जिल्ह्यात उन्हाळ सोयाबीनची पेरणी नोव्हेंबर महिन्यातच सुरू होते. त्यात कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देण्यात येते. पाण्याची अडचण असल्याने पेरणी वाढणार नाही. ज्या भागात शाश्वत जलस्रोत आहेत, त्या भागात इतर पिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबकच्या माध्यमातून सोयाबीनचे सिंचन करण्याचे नियोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladakh Development Boost : लडाखला ३,३५० कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लेह विमानतळासह सामरिक रस्त्याचे लोकार्पण

IND vs WI, 4th T20I: शे होपची बॅट पुन्हा तळपली, ठोकलं ५० चेंडूत शतक; भारताला विजयासाठी पार करावं लागणार विक्रमी टार्गेट

Maharashtra Live News : उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेर थरार; डोक्यात दोन गोळ्या झाडून हरीश गजवानी यांची भररस्त्यात हत्या

Pune News : खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

BCCI Chief Selector: अजित आगरकरची जागा कोण घेणार? पार्थिव पटेलचा मोठा निर्णय अन् शर्यतीत ट्विस्ट

SCROLL FOR NEXT