Oxygen Tanker Sakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात टँकरद्वारे ९६ टन ऑक्‍सिजनचा पुरवठा

जिल्ह्यात ऑक्‍सिजन पुरवठ्यात वाढ झाल्‍याने ऑक्‍सिजन टंचाईची तीव्रता कमी झाली आहे

अरुण मलानी

नाशिक : जिल्ह्यात ऑक्‍सिजन पुरवठ्यात वाढ झाल्‍याने ऑक्‍सिजन टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. दैनंदिन गरजेच्‍या सुमारास ऑक्‍सिजन उपलब्‍ध होत असल्‍याचे आकडेवारीतून स्‍पष्ट होते. शनिवारी (ता. ८) सात ट्रँकरद्वारे ९६ टन ऑक्‍सिजन नाशिकसाठी उपलब्‍ध झाला, तर १९.६ टन ऑक्सि‍जनची निर्मिती स्‍थानिक प्रकल्‍पातून झाल्‍याचे प्रशासकीय यंत्रणेने सांगितले.

कोरोना बाधितांसोबत अन्‍य विविध आजारांवर रुग्‍णालयांत उपचार घेत असलेल्‍या रुग्‍णांना ऑक्‍सिजनची आवश्‍यकता भासत आहे. काही दिवसांपासून ऑक्‍सिजन टंचाईचा प्रश्‍न गंभीर झाला होता. परंतु सध्या ऑक्‍सिजनची गरज जेमतेम भरून निघत आहे. शनिवारी जिल्ह्यातील काही रुग्‍णालये व वितरकांना सात ट्रँकरद्वारे ९६ टन ऑक्‍सिजन प्राप्त झाला. यापैकी अकरा आणि पंधरा टनाचे असे दोन टँकर वेळेवर पोचू शकले नाहीत. टँकरद्वारे झालेल्‍या पुरवठ्यासोबत स्‍थानिक पुरवठादारांकडून १९.६ टन ऑक्‍सिजनची निर्मिती करण्यात आली. हे ऑक्‍सिजनदेखील रुग्‍णालयांसाठी उपलब्‍ध झाले होते. असे एकूण ११५.६ टन ऑक्‍सिजन दिवसभरात उपलब्‍ध झाल्‍याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT