नाशिक

पारखे कुटुंब मदत

CD
धुळे : टुडे पान २ साठी... --- फोटो क्रमांक : 34891 अंबोडे (ता. धुळे) : कन्हेरी नाल्याच्या पुरात पिता-पुत्र गमावलेल्या रत्नाबाई पारखे यांना भाऊबीजेच्या निमित्ताने मदत सुपूर्द करताना उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, प्रफुल्ल पाटील. --- अंबोडेतील पारखे कुटुंबाला आर्थिक मदतीचा आधार पालकमंत्री रावलासह उपमहापौर पाटलांकडून मदत सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १२ : अतिवृष्टीमुळे कन्हेरी नाल्याच्या पुरात अंबोडे (ता. धुळे) येथील पिता-पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या पारखे कुटुंबाला सामाजिक स्तरावरून आधार मिळाला आहे. ३१ जुलै २०२६ ला अंबोडे येथील आनंदा भागवत पारखे आणि त्यांचा मुलगा नितीन आनंदा पारखे हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जागीच मृत्यू पावल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या प्रसंगात रत्नाबाई आनंदा पारखे यांना साहाय्य करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आर्थिक मदत जाहीर केली. दरम्यान दिवंगत आनंदा पारखे यांचे निकटवर्तीय असलेले प्रफुल्ल पाटील यांच्या पत्नी तथा महापालिकेच्या उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांनी त्यांचे एक महिन्याचे संपूर्ण मानधन भाऊबीजेच्या निमित्ताने थेट रत्नाबाई पारखे यांच्याकडे सुपूर्द केले. या वेळी प्रफुल्ल पाटील, उपमहापौर पाटील यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन कुटुंबाची विचारपूस केली. या संवेदनशील मदतीमुळे दुःखात सापडलेल्या पारखे कुटुंबाला आधार मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ वाचणार, अटल सेतू-एक्स्प्रेसदरम्यानचे ६७ टक्के काम पूर्ण

India Inflation: भारतात महागाईचा कहर, ऑक्टोबर मध्ये गाठला दोन वर्षातील उच्चांक; दर RBI च्या मर्यादेपलीकडे

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! राज्यात अवघ्या ७ महिन्यांत रस्ते अपघातात ९,१९५ जणांचा मृत्यू

Winter Special Broccoli Soup: थंडीच्या दिवसांत शरीराला द्या पोषणाची साथ! बनवा गरमागरम ब्रोकली सूप आणि क्रीमी टोस्ट

PM Narendra Modi: 'मी कधीकाळी पत्रकारांसाठी खुर्च्याही लावायचो!' पंतप्रधान मोदींनी सांगितले फॅक्सपासून इन्स्टाग्राम रील्सपर्यंतचे भन्नाट किस्से

SCROLL FOR NEXT