Crime News
Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : 4 कोयते, 2 तलवारीसह संशयित जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : गेल्या सोमवारी (ता. १७) रात्रीपासून मंगळवारी (ता. १८) पहाटेपर्यंत शहर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करीत चार लोखंडी कोयते आणि दोन तलवारी जप्त करीत संशयितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईने सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. (Suspects jailed with 4 knives 2 swords Nashik Crime News)

पंचवटीतील कुमावत नगरमध्ये गेल्या मंगळवारी (ता. १८) पहाटे पंचवटी पोलिसांनी एकाला लोखंडी कोयत्यासह अटक केली. योगेश दत्तू क्षीरसागर (३४, रा. कुमावतनगर, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर येथील कार्बन नाका परिसरातून राहील नुरुद्दीन सय्यद (१९, रा. दत्त मंदिर चौक, शिवाजीनगर, सातपूर) यास गेल्या सोमवारी (ता. १७) रात्री पावणे बाराच्या सुमारास लोखंडी कोयत्यासह सातपूर पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, उपनगर परिसरातील रोकडोबा वाडी पुलाजवळ दोघांना कोयत्यासह अटक केली. गोविंदा संजय साबळे (२२, रा. भोर मळा, जुना ओढा रोड, नाशिकरोड), निरन उर्फ नर्या उर्फ नरेश नागू नरोटे (२०, रा. अरिंगळे मळा, एकलहरा रोड) असे दोघा संशयितांची नावे असून दोघांच्या अंगझडतीतून दोन कोयत्यासह त्यांची दुचाकी असा ६० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सदरची कारवाई मंगळवारी (ता. १८) पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास दरोडा व शस्त्रविरोधी पोलीस पथकाने केली असून, याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोडला तलवारी जप्त

सामनगाव रोडवरील अश्विनी कॉलनीत पोलिसांनी दोघा संशयितांकडून दोन तलवारी जप्त केल्या. निकेश अशोक जाधव (३३), आतिश शांताराम चौधरी (१९, दोघे रा. अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. नाशिकरोड पोलिसांनी मंगळवारी (ता. १८) सदरची कारवाई करीत दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT