Vandalism of vehicles esakal
नाशिक

Nashik Crime News : वाहनांची तोडफोड करणाऱ्या संशयीतांना अवघ्या 2 तासात अटक

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : काठे गल्ली भागात बंगल्यासमोर उभे असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना बुधवार (ता.१) उघडकीस आली. गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासात भद्रकाली गुन्हे शोध पथकाने संशयीतांना ताब्यात घेतले. (Suspects vandalizing vehicles arrested in just 2 hours Nashik Crime News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

मंगळवारी (ता.३१) मध्यरात्री तीन संशयितांकडून तोडफोड करत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. बुधवारी पोलिसांना माहिती मिळताच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. गुन्हे शोध पथकास संशयित तपोवन भागात येत असल्याची माहिती पथकास मिळाली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनात पथकाचे सहाय्यक निरीक्षक किशोर खांडवी, संदीप शेळके, कय्यूम सय्यद, विशाल काठे, श्यामकांत पाटील, संजय पोटिंदे यांनी तपोवन परिसरात सापळा रचून मंदार ऊर्फ नीलेश कृष्णराव पवार (२५), विकी शांताराम जावरे (२१), सुमीत मिलिंद पगारे ( २५) अशा तिघांच्या मुसक्या आवळल्या.

मद्याच्या नशेत त्यांनी चार चारचाकीची दांडक्याने आणि दगडाने काच फोडून नुकसान केले. तसेच शंकरनगर येथील कृपा निवास घराचे खिडकीवर दगड फेकून तोडफोड केली. संगीता शेळके यांच्या जीवितास धोका निर्माण होईल असा प्रयत्न केला. भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. पवार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT