Dr. Prachee Pawar esakal
नाशिक

Nashik Crime News : डॉ. पवारांवर हल्ला करणारे संशयित अद्यापही मोकाटच!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर रोडवरील गोवर्धन शिवारात डॉ. प्राची पवार यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी संशयित अद्यापही मोकाट आहेत. घटनेला तीन दिवस उलटूनही संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेली नाही. (Suspects who attacked Dr prachi Pawar still out Nashik Crime News)

डॉ. प्राची पवार या त्यांच्या गोवर्धन शिवारातील पवार फार्म हाउसवर मंगळवारी (ता. १३) रात्री साडेसात-आठच्या सुमारास दुचाकीने जात होत्या. त्यावेळी फार्म हाऊसबाहेर रस्त्यावर संशयितांनी दुचाकी आडवी लावली होती. याबाबत डॉ. पवार यांनी हटकले असता, संशयितांनी त्यांच्याकडील कोयत्याने त्यांच्या हातावर वार केले.

आसपासच्या नागरिकांनी धाव घेतल्यानंतर संशयित दुचाकीवरून पसार झाले. तर डॉ. पवार यांना तत्काळ पंडित कॉलनीतील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसात तीन संशयितांविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याच्या घटनेला तीन दिवस उलटूनही पोलिस संशयितांना अटक करण्यात अपयशी ठरले आहेत.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

फार्म हाऊसबाहेर सीसीटीव्ही नसल्याने संशयितांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश येत आहे. तक्रारदार डॉ. पवार यांनाही संशयित अनोळखी असल्याने पोलिसांना संशयिताचा शोध घेणे जिकिरीचे जात असल्याचे समजते.

ॲड. ठाकरे यांनी घेतली भेट

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी सुश्रुत हॉस्पिटलमध्ये डॉ. प्राची पवार यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. डॉ. पवार यांच्यावरील हल्ल्याचा त्यांनी जाहीर निषेध केला. नाशिकमधील कायदा-सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. मविप्र संस्थेचे माजी संचालक विजय गडाख, डॉ. अशोक पिंगळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेल अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT