Suspension news esakal
नाशिक

Nashik News: जिल्हयातील 2 ग्रामसेवकांचे निलंबन अन् 4 जणांची चौकशी! ग्रामपंचायत निवडणुकानंतर वाढला रोष

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर ग्रामसेवकांविरोधातील तक्रारी वाढल्या असून सरपचांसह सदस्यांकडून ग्रामसेवक बदलीची मागणी वाढली आहे. याची दखल घेत दोन ग्रामसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे. चौघांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Suspension of 2 gram sevaks in district and investigation of 4 people Anger increased after Gram Panchayat elections Nashik News)

जिल्हयातील अनेक ग्रामपंचायतीत सत्तातंर झाले आहे. तरूण अन नव्या चेह-यांना संधी मिळाली आहे. निवडणुकीत गावा-गावातील गट-तटाचे राजकारण झाल्याचे बघावयास मिळाले. आता हेच राजकारण जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागापर्यंत येऊन पोहचले आहे. सत्ताधा-यांकडून ग्रामसेवकांविरोधात तक्रारी सुरू झाल्या आहेत.

साधारणः दररोज दोन ते तीन गावातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचे शिष्टमंडळ मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेत असून ग्रामसेवकांच्या तक्रारी मांडत असल्याचे दिसत आहे. उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांची भेट घेत त्यांना निवेदन देत थेट ग्रामसेवकांची बदली करण्याचे मागणी शिष्टमंडळाकडून केली जात आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

या तक्रारींवरून गत आठवडयात जिल्हयातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील प्रत्येक एक अशा दोन ग्रामसेवकांचे निलंबन करण्यात आले. आतपर्यंत २० ते २५ हून अधिक तक्रारी मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवारी (ता.२) दिवसभरातच ४ गावातील सरपंच, सदस्यांनी लेखी तक्रारी केल्या आहेत.

इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रक ग्रामपंचायत ग्रामसेवकांची विशाल पिचा व दीपक श्रीश्रीमाळ यांनी टाकेद, देवगाव ग्रामसेवकांची सरंपच पार्वताबाई झोले यांसह ग्रामपंचायतींच्या सर्व सदस्यांनी लेखी तक्रार केली आहे.

दोडी बुद्रक ग्रामसेवकांची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामसेवकांने अस्तित्वात असलेले रस्ते बंद करून नव्याने केलेले रस्ते अपघाताला कारणीभूत ठरत असल्याची तक्रार या ग्रामस्थांनी केली आहे. अंतापूर ग्रामसेवकांविरोधात अनिकेत सोनवणे यांनी शासनाच्या निधी अनुदानात अपहरम केल्याची तक्रार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप ZP, पंचायत समितीसाठी उमेदवार कसे शोधणार? स्ट्रॅटेजी ठरली, ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी

Kolhapur : मिशन जिल्हापरिषद! कार्यकर्ता नाही वारदार महत्वाचा, कोल्हापुरात नेत्यांकडून मुलगा, सून, पुतण्या, रिंगणात उतरवण्याच्या तयारीत

Virat Kohli: भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना विराट कोहलीचे उत्तर, बरंच काही बोलून गेला! पाहा शास्त्री-गिलख्रिस्टने घेतलेली मुलाखत Video

Maharashtra Politics: ‘त्या’ बॅनरमुळे पुन्हा चर्चा! भाजपने शिंदे सेनेला डिवचले, महायुतीमध्ये संघर्ष वाढला

Latest Marathi News Live Update : मनसेच्या गोरेगावमधील मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात

SCROLL FOR NEXT