godavari 12345.jpg 
नाशिक

गोदावरीवरील तीन पुलांना स्थगिती; आग्रही असलेल्या राजकीय नेत्यांना दणका

विक्रांत मते

नाशिक : गोदावरी नदीवर बांधल्या जात असलेल्या दोन पुलांसह प्रस्तावित आणखी एका नवीन पुलाच्या कामाला राज्याच्या नगरविकास विभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशावरून स्थगिती दिल्याने पुलासाठी आग्रही असलेल्या राजकीय नेत्यांना दणका बसला आहे.

आग्रही असलेल्या राजकीय नेत्यांना दणका

चव्हाण कॉलनीतील स्थानिक रहिवाशांनी पुलाच्या कामाला विरोध करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १७ डिसेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती एस. जे. काथावाला व छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने नगरविकास विभागाला स्थगिती देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी सु. द. धांडे यांनी महापालिकेला पत्र पाठविले. या पत्रात पुलासंदर्भात स्वयंस्पष्टता अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांना दिल्या.

मागणी नसताना पूल तयार केले जाताएत

गोदावरीवर गंगापूर रोडच्या बाजूने आसाराम बापू आश्रमाजवळ, फॉरेस्ट नर्सरी व इंद्रप्रस्थ हॉल येथे तीन पूल असताना नव्याने तीन पुलांची गरज नाही. या भागात रहदारी नाही किंवा नागरिकांचीही मागणी नसताना पूल तयार केले जात असल्याचा स्थानिक नागरिकांचा आक्षेप आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT