married woman 123.jpg 
नाशिक

"तिच्या" सासरच्यांनी वचन दिले..कि तसा प्रकार पुन्हा होणार नाही...पण शेवटी....

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : चारित्र्यावर संशय घेत पती आणि सासरच्या लोकांकडून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात पती संदीप अशोक बोरसे, सासरे अशोक गुलाबराव बोरसे, सासू लता अशोक बोरसे, दीर विजय अशोक बोरसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

असा घडला प्रकार...

पीडितेचा 17 मे 2009 मध्ये चाळीसगाव येथील संदीप बोरसे यांच्याशी विवाह झाला होता. दोन महिन्यांत पती आणि सासरच्या लोकांकडून विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा छळ सुरू झाला. शिवीगाळ करत मारहाण करण्यासारखे प्रकार सुरू होते. विवाहितेने याची कल्पना आईला दिली. ऑगस्ट 2009 मध्ये आईने विवाहितेस माहेरी आणले. त्यानंतर दोन महिन्यांनी पती आणि सासरचे लोक माहेरी येऊन आता तसे घडणार नाही, असे सांगत विवाहितेला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आईने पाठविले नाही. सासरच्या अन्य नातेवाइकांनी समजूत घातल्यानंतर विवाहिता नांदावयास गेली. परंतु पुन्हा त्यांनी त्रास देण्यास सुरवात केली असून, पीडितेच्या तक्रारीनुसार अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT