नाशिक

साक्रीत पंगस माशांचे शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन विषयावर कार्यशाळा

CD
MSI26B09763 साक्री : ‘पंगस माशांचे शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन’ कार्यशाळेचे उद्‌घाटन करताना चंद्रजित पाटील. शेजारी कृषी विभागाचे अधिकारी. --------------------- शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे चंद्रजित पाटील : शेतकऱ्यांसाठी मत्स्यसंवर्धनावर कार्यशाळा सकाळ वृत्तसेवा म्हसदी, ता. २३ : पावसाच्या अनिश्चितता, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे अर्थचक्र विस्कळीत झाले आहे. नापिकीच्या सातत्यपूर्ण संकटाने शेतकरीवर्ग आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता मत्स्यपालनासह विविध शेतीपूरक जोडधंद्यांचा कृतीशीलतेने अवलंब केल्यास त्यांच्या उत्पन्नाला शाश्वत आधार मिळून जीवनमान अधिक समृद्ध होईल, असे मत चंद्रजित पाटील यांनी व्यक्त केले. साक्री येथील विद्या विकास मंडळाच्या सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, तालुका कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व धुळे येथील मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्तांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंगस माशांचे शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा शुक्रवारी (ता. १६) घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे अध्यक्षस्थानी होते. धुळे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त जयेश बळकटे, प्राचार्य डॉ. शत्रुघ्न पाटोळे प्रमुख मार्गदर्शक होते. प्रथम सत्रात प्राचार्य डॉ. पाटोळे यांनी माश्यांचे विविध प्रकार सांगून त्यांचे मत्स्यसंवर्धन कसे करावे, याविषयी मार्गदर्शन केले. श्री. बळकटे यांनी शेततळ्यात पंगस माशांचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन, मत्स्यबीजाची निवड, पाण्याची गुणवत्ता, खाद्यव्यवस्थापन, रोगनियंत्रण, उत्पादन आणि बाजारपेठ यासंबंधी माहिती दिली. शेततळ्याचा शेतीपूरक व्यवसायासाठी प्रभावी उपयोग करून शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करावे, असे आवाहन केले. योगेश सोनवणे यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानासोबत शेतीपूरक व्यवसायांची सांगड घालण्याचे महत्त्व स्पष्ट केले. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत शेतकऱ्यांनी आधुनिक व शास्त्रोक्त पद्धतींचा स्वीकार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य डॉ. अनंत पाटील, माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे, प्रज्ञा पवार, उपप्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, शेतकरी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कृषी अधिकारी तानाजी सदगीर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दत्तात्रय वाघमारे यांनी आभार मानले. सहायक कृषी अधिकारी अविनाश कुवर, मनोज साबळे, संदीप शिंदे, निलेश भदाणे, अविनाश जाधव, वैशाली बारीस, जितेंद्र देसले, जितेंद्र पगारे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विक्रांत पाटील, प्रा. राजू देवकर, प्रा. अनिकेत वाघमोडे, गौतम बच्छाव यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price fall before Dhanteras Diwali : धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी स्वस्त! एकाच झटक्यात दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे भाव..!

फटाके बनवताना भीषण स्फोट! ७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Maharashtra weather cyclone update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस खोडा घालणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!

Data Security : डेटा सुरक्षेत हलगर्जी भोवणार; आस्थापनांवर दंडाची टांगती तलवार; सहकारी बॅंका आणि पतसंस्थांनाही नियमावली लागू

SCROLL FOR NEXT