धुळे : टुडे पान २ साठी...सेकंड मेन
---
फोटो क्रमांक : 35026
धुळे : एसव्हीकेएम सीबीएसई स्कूलच्या वार्षिक क्रीडामहोत्सवात विजेत्या सदनाला करंडक प्रदान करताना धरती देवरे. शेजारी मान्यवर, विद्यार्थी.
---
‘एसव्हीकेएम’ स्कूलच्या क्रीडा महोत्सवाची सांगता
अभ्युदय-उत्कृष्टतेची दशकपूर्ती संकल्पनेने वेधले लक्ष; विविध उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (एसव्हीकेएम) संचालित येथील एसव्हीकेएम सीबीएसई स्कूलचा वार्षिक क्रीडामहोत्सव २०२६-२७ चा दुसरा दिवस चौथी ते बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सहभागाने उत्साहात पार पडला. संस्थेच्या गौरवशाली दहा वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचे प्रतीक असलेल्या ‘अभ्युदय-उत्कृष्टतेची दशकपूर्ती’ या संकल्पनेअंतर्गत हा सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला.
दीपप्रज्वलन व शालेय गायनवृंदाच्या प्रार्थनेने सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एसव्हीकेएम व एनएमआयएमएस धुळे कॅम्पसचे अध्यक्ष संजय अग्रवाल, परीक्षा नियंत्रक सुनील गुप्ता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थीप्रमुख अंशुमन पाटील, विद्यार्थिनीप्रमुख सेजल जैन, उपविद्यार्थिनीप्रमुख खुशी अग्रवाल आणि विद्यार्थी उपप्रमुख शिवतेज वाघ यांनी संचलनाचे नेतृत्व केले. एमराल्ड, रुबी, सॅफायर आणि टोपाझ या चारही सदनांनी रंगीत गणवेशात संचलन केले. नंतर विद्यार्थी क्रीडा प्रतिनिधी राज बिश्नोई यांच्यापासून सुरू झालेला ऑलिंपिक मशाल दौरा अमोघ अजमेरा, आयुष पाटील, आर्यन बाविस्कर व मुलींच्या टेबल टेनिस संघातील खेळाडूंतून मार्गक्रमण करत आरव अग्रवालमार्फत प्रमुख पाहुण्यांकडे पोहोचला. पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली आणि रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून महोत्सवाचे उद्घाटन झाले.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन
महोत्सवात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे लेझीम प्रात्यक्षिक, जिम्नॅस्टिक्समधील संतुलन, सातवी-आठवीचे अभिमान संचलन आणि मार्शल आर्ट्सचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले. तसेच अडथळा शर्यत, शटल शर्यत, १०० मीटर धावणे आणि मिश्र रिले स्पर्धांमध्ये मुला-मुलींनी सुंदर खिलाडूवृत्ती दाखवली. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. प्रकाशमान काठ्या व उत्साही संगीताच्या तालावर सादर झालेल्या भांगडा नृत्याने वातावरण उजळून निघाले. सदन प्रमुखांना प्रतिष्ठेचा २०२६-२७ चा सदन करंडक प्रदान करण्यात आला. विद्यार्थिनीप्रमुख सेजल जैन हिने आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, कॅम्पस अध्यक्ष संजय अग्रवाल, प्राचार्या सुनंदा मेनन यांनी उपक्रमाचे कौतुक केले. क्रीडाशिक्षक दीपक मनोरे, क्रीडा प्रशिक्षक देवा मोरे, चेतना देशमुख, उपेंद्रसिंग पवार, प्रद्युमनसिंग, विनिश पाडवी, अमृत पाटील, माधव साळवे आदींनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.