नाशिक

विज्ञान संग्रहालय भेट

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H34296 धुळे : स्व. प्रतिभा देशपांडे विज्ञान संग्रहालयात विज्ञानाच्या संकल्पना समजून घेतांना श्रीजी इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थीनी. --- स्व. प्रतिभा देशपांडे विज्ञान संग्रहालयास विद्यार्थ्यांची भेट --- घासकडबी संस्था, कुमारनगर वेल्फेअर संस्थेचा उपक्रम --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २ : घासकडबी शैक्षणिक संस्थेच्या स्व. प्रतिभा देशपांडे विज्ञान संग्रहलयास शहरातील श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूल व हंसराज ओंकारमाल शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट दिली. प्रा. वसंत यशवंत घासकडबी व मंदाकिनी वसंत घासकडबी शैक्षणिक संस्था धुळे शहरात विज्ञान व गणित क्षेत्रात गेल्या २० वर्षांपासून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या माध्यमातून धुळ्यातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीपर्यंत जात आहेत. विज्ञानाच्या संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगतून समजावून घेण्यासाठी स्व.सौ. प्रतिभा देशपांडे विज्ञान संग्रहालय सुरु केले आहे. सध्या हे संग्रहालय घासकडबी संस्था व कुमार नगर वेल्फेअर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्वामी टेऊराम हायस्कूल येथे सुरु आहे. हे संग्रहलाय सर्वांसाठी खुले असून या संग्रहालयाच्या माध्यमातून विज्ञानच्या संकल्पना समजण्यास मदत होते. श्रीजी इंग्लिश मेडीयम स्कूलच्या इयत्ता सहावी व सातवीच्या ४५ विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट दिली व विज्ञानाचे प्रयोगही करून पाहिले. तसेच, हंसराज ओंकारमल अग्रवाल शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी ४५ विद्यार्थी, शिक्षकांनीही भेट दिली व विज्ञानच्या संकल्पना समजावून घेतल्या. दरम्यान, विज्ञान संग्रहालायचा लाभ मुख्याध्यपकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना करून द्यावा. तसेच, धुळेकर नागरिकांनीही याचा लाभ घ्यावा, असे आवाहन घासकडबी संस्थेचे सचिव डॉ. एन. एम. जोशी, कुमार नगर वेल्फेअर संस्थेचे सचिव डॉ. विलास रेलन यांनी केले आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाहरुख खानच्या बहिणीला पाहिलंत का? प्रसिद्धीपासून दूर, काय करते किंग खानची सख्खी बहीण?

सूर्याच्या राशीबदलाने ८ राशींचे अच्छे दिन! नोकरी, पैसा अन् व्यवसायात होणार मोठे बदल

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील लेकाची भरारी! PSI, नायब तहसीलदार ते DySP जिद्दीचा प्रवास; शिवप्रसाद पारवेंची स्वप्नपूर्तीची प्रेरणादायी कहाणी..

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेतील तारण कर्जाचे सोने बनावट, गोपीचंद पडळकरांचा आरोप

Weather Change Health Tips: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; बदलत्या हवामानात आजारी पडू नये म्हणून करा ५ गोष्टी!

SCROLL FOR NEXT