Speaking at a meeting of hoteliers, Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar.
Speaking at a meeting of hoteliers, Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar.  esakal
नाशिक

Swachha Sarvection 2023: गरज 15 टन, मिळतो फक्त दीड टन ओला कचरा!वेस्ट एनर्जी प्रकल्प टिकविण्याची NMCची धडपड

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : संपूर्ण देशभरामध्ये पथदर्शी ठरलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्प वाचवण्यासाठी महापालिकेचे धडपड सुरू आहे.

या प्रकल्पासाठी १५ टन ओल्या कचऱ्याची आवश्यकता असताना फक्त दीड टन मिळत असल्याची बाब हॉटेल व्यवसायिकांच्या बैठकीच्या माध्यमातून समोर आली. वीजनिर्मिती प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी हॉटेल चालकांनी ओला कचरा संकलित करून प्रकल्पासाठी देण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. (Swachha Sarvection 2023 Need 15 Tons Gets Only one half Tons of Wet Waste NMC Struggle to Save Waste Energy Project nashik news)

आगामी स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल चालकांची बैठक महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली. स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ अंतर्गत नाशिक शहराचा क्रमांक उंचावण्यासाठी या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

यात वेस्ट एनर्जी प्रकल्पाला लागणारा ओला कचरा कमी पडत असल्याने प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी ओला कचरा संकलित करण महत्त्वाचे असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी ओला कचरा, सुका कचरा वेगळा हवा असल्याचे सांगून वेस्टेज फूड वेगळ्या कंटेनरमध्ये द्यावे, असे आवाहन केले.

५० ते १०० किलोपेक्षा जास्त ओला कचरा असल्यास त्याची विल्हेवाट संबंधित आस्थापने लावू शकतात. त्यासाठी कंपोस्टिंग, बायोगॅस असे पर्याय असल्याचे सांगितले. लवकरच केटरर्स आणि मॅरेज हॉल व्यावसायिकांचीही बैठक घेणार असल्याचे सांगितले.

प्लॅस्टिक बंदीबाबतही डॉ. पलोड यांनी माहिती दिली. २०२२ या वर्षात शहरात ४०९ केसमधून २१ लाख ५५ हजारांचा दंड आकारल्याचे सांगितले. उदय धर्माधिकारी यांनी वेस्ट टू एनर्जी प्लॅन्टबाबत माहिती देऊन शहरातून १५ मेट्रीक टन फूड वेस्टेज अपेक्षित असल्याचे सांगितले. मात्र, केवळ दीड टन फूड वेस्टेज संकलित होते.

त्यातून केवळ २०० ते २५० किलोवॅट वीजनिर्मिती होते. ३३०० किलोवॅट वीजनिर्मिती अपेक्षित असल्याचे सांगितले. शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी वाहतूक बेटे, दुभाजकाचे दहा वर्षांसाठी प्रायोजकत्व घेण्याचे आवाहन केले.

हॉटेल आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी प्रायोजक असलेले दिशा दर्शक बोर्ड टॅक्स फ्री करण्याची सूचना केली. उड्डाणपुलाचे खांब तसेच शासकीय इमारतींच्या भिंती रंगवून त्यावर स्वच्छता विषयक घोषवाक्य, चित्र रंगवून जनजागृती करण्याचे सुचविले. हॉटेल आणि बार असोसिएशनचे श्रीधर शेट्टी, हनुमंत शिंदे, मोहन पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

लोकसहभाग नोंदवा

स्वच्छ स्पर्धेत इंदूर शहराने कायम वरचे स्थान ठेवल्याने त्या शहरातील जीवनपद्धती बदलली आहे. इंदूर प्रमाणेच नाशिक शहर सुंदर करण्यासाठी, बदल घडवण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.

प्रत्येक नागरिकाने ‘माझे शहर स्वच्छ आहे. ते मी घाण होऊ देणार नाही’ यासाठी दक्ष राहिले पाहिजे. शहर स्वच्छ राहण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण महत्त्वाचे आहे. ‘मानवतेची भिंत’ उभारून तेथे वापरण्यायोग्य कपडे, वस्तु ठेवण्याचे आवाहनही आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT