नाशिक

शासकीय कार्यालयांना ‘स्वच्छता दिना’चा विसर

CD
शासकीय कार्यालयांना ‘स्वच्छता दिना’चा विसर महात्मा गांधी जयंतीनिमित्त राबविण्यात येणारे उपक्रम यंदा शून्यावर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक आस्थापनांमध्ये राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेचा आता सर्वांनाच विसर पडलेला दिसून येतो. शुक्रवारी शहरात कुठेही स्वच्छता मोहीम दिसून आली नाही उलट अधिकारी शासकीय सुटीचा आनंदात फिरताना दिसले. राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची शुक्रवारी (ता.२) जयंती साजरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ पासून गांधी जयंतीला स्वच्छता दिनाची जोड देण्याची संकल्पना सुरु केली आहे. गेल्या दहा वर्षांचा हा शिरस्ता यंदा फिका पडल्याचे दिसून आले. गांधी जयंतीला नदी नाल्यांची स्वच्छता, शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ करणे, वृक्ष लागवड करणे, रस्त्यांची स्वच्छता अशा स्वरूपाचे उपक्रम राबविले जातात. पण चालू वर्षी या स्वरूपाचे कार्यक्रम शासकीय पातळीवर झाल्याचे दिसून आले नाही. शासकीय कार्यालयांमध्ये गांधी जयंती साजरी करण्यात आली. पण, स्वच्छतेचा विसर या अधिकाऱ्यांना पडल्याचे दिसून आले. विसर पडला की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, हा संशोधनाचा विषय ठरेल. पण स्वच्छता दिनाचे महत्त्व हळूहळू कमी होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. जनजागृतीचा मुख्य उद्देश अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांनी हाती झाडू घेतला म्हणजे देश स्वच्छ होतो, असे नाही. तर आपले आदर्श ज्या स्वरूपाचे वर्तन ठेवतात, त्यातून देशभावना जागृत होते. विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागते. प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून परिसर स्वच्छ् केला जातो. यातून जनजागृती तर होते, याशिवाय आपला परिसर आपणच स्वच्छ् ठेवायला हवी, अशी धारणा दृढ होण्यासाठी या स्वरूपाचे उपक्रम राबविण्यामागील संकल्पना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT