नाशिक

स्वामी सागरानंद सरस्वती चतुर्थ पुण्यस्मरण

CD
NSK26H33551 त्र्यंबकेश्वर : स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त आनंद आखाड्यात जमलेले साधु-महंत, भाविक व नागरिक. (छायाचित्र ः कमलाकर अकोलकर) … स्वामी सागरानंद सरस्वतींना अभिवादन साधू- महंतांसह कुंभमेळा मंत्री महाजन, आमदार, नगराध्यक्षांची उपस्थिती त्र्यंबकेश्‍वर, ता.२५ : स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त आनंद आखाड्यात आयोजित कार्यक्रमास सर्व साधू-महंतांनी उपस्थिती लावत भावना व्यक्त करत अभिवादन केले. समर्पित भावनेने आपले आयुष्य जगलेले सागरानंद सरस्वती यांनी सर्वांना आनंद दिला. आबालवृद्धांसह सर्वांशी त्यांचे ऋणानुबंध राहिल्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीला एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे गौरवोदगार तपोनिधी पंचायती आनंद आखाड्याचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत स्वामी शंकरानंद सरस्वती यांनी काढले. पुण्यतिथीनिमित्त सकाळी सात ते नऊपर्यंत शांतपाठ, अभिषेक व सागरानंद सरस्वती महाराज यांच्या समाधीचे पुजन करण्यात आले. सकाळी साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन झाले. त्र्यंबकेश्वर येथील सर्व वारकरी गुरुकुल संस्थेचे अध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्र्यंबकेश्‍वरमधील सर्व आखाड्यांचे साधू- महंत उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांनी स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या समाधीचे दर्शन घेतले. --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT