Swami Samarth Kendra Extortion case suspect sarika sonavane esakal
नाशिक

Swami Samarth Kendra Extortion Case: खंडणी प्रकरणातील संशयितांना जामीन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर पोलिस ठाण्यात दहा लाखांच्या खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित महिला कृषी अधिकाऱ्यासह तिचा मुलगा व भावाला न्यायालयाने जामीन मंजूर केला.

गेल्या १९ तारखेला याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Swami Samarth Kendra Extortion Case Suspects granted bail in extortion case nashik crime)

सारिका बापूराव सोनवणे (वय ४२), मुलगा मोहित सोनवणे (वय २५, रा. नाशिक), विनोद सयाजी चव्हाण (वय ४४, रा. देवळा) अशी जामीन मंजूर झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे विश्वस्त निंबा शिरसाठ यांच्या फिर्यादीनुसार, संशयित मायलेकांनी त्यांना आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली होती.

गेल्या १८ तारखेला रात्री गंगापूर पोलिस व खंडणीविरोधी पथकाने दोघांना अटक केली होती. यात संशयिताचा भाऊ विनोद चव्हाण याचाही सहभाग निष्पन्न झाल्याने त्यासही अटक केली होती.

त्यांच्या जामीन अर्जांवर बुधवारी (ता. २९) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांच्यासमोर सुनावणी झाली. त्या वेळी तिघा संशयितांना अटी-शर्तींच्या अधीन राहून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंगावर शाल, कानावर रुमाल; बहुमत पाहिजे म्हणून आजारी नगरसेवकाला रुग्णालयातून थेट बैठकीला आणलं

Vishnupuri Dam: ‘विष्णुपुरी’ ९७ टक्के भरले; गेट उघडणार; नांदेडकरांची पाण्याची चिंता मिटली; एका दिवसातच ५५ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला

Friendship Day 2026: मैत्रीचा उत्सव! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि मित्रांसाठी खास शुभेच्छा मेसेज...

Latest Marathi News Live Update : केरळमध्ये मुसळधार पाऊस; पुरात ६ जण वाहून गेले

Purwa Falls Viral Video: या धबधब्या पुढे सारं काही फिके! पाहा २३० फूट उंचीवरून कोसळणाऱ्या पाण्याचे अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT