नाशिक

विभागीय जलतरण स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंची निवड

CD
NSK26H34411 जळगाव : विभागस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंसह मार्गदर्शक डॉ. रणजीत पाटील व महाविद्यालयाचे पदाधिकारी. विभगीय स्पर्धेत सहा जलतरणपटूंचे यश स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे प्राविण्य सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.३ : शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंनी प्राविण्य मिळविले आहे. या खेळाडूंची आगामी शालेय विभागस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये अनिरुद्ध खामकर, तेजस चौधरी, पार्थ अहिरे, सुयोग सरोदे, ऋतुजा भंडारी आणि लोचना वाघ यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत या खेळाडूंनी विविध जलतरण प्रकारांत सहभाग नोंदवत कौशल्यपूर्ण कामगिरी केली. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक डॉ. रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल एम.जे. स्वायत्त महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. केतन नारखेडे, के.सी.ई. सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. आर. बी. ठाकरे, प्रा. स्वाती बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन, पर्यवेक्षिका प्रा. शिल्पा सरोदे, कला व वाणिज्य शाखेचे समन्वयक प्रा. उमेश पाटील, विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा. गुणवंत वंजारी आणि जिमखाना समितीच्या अध्यक्षा प्रा. वर्षा पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच विभागस्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा देत त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Iran War: नेतन्याहू यांचा मोठा प्लॅन लीक! इराणला उद्ध्वस्त करण्याचा डाव? चार लष्करी अधिकाऱ्यांच्या खिशात...

Operation Lotus: जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन कमळ’? राजकीय चर्चांना उधाण; काय म्हणाले राम माधव?

Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मिठाई विक्रेत्यांना दणका! कोंढवा, आळंदीतून १ हजार ४९१ किलो मिठाई जप्त करून नष्ट

Mumbai Bengaluru Train: मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपरची क्रेझ! महागड्या प्रथम श्रेणीचे आरक्षणही 'रिग्रेट', प्रतीक्षा यादी शंभरीपार

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

SCROLL FOR NEXT