नाशिक

साक्री शारदोत्सव व्याख्यानमाला

CD
धुळे : मुख्य अंकातील पानासाठी....अँकर -- फोटो क्रमांक : 32214 साक्री : श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या वतीने होणाऱ्या शारदोत्सव व्याख्यानमालेत बोलताना डॉ. शिरीषकुमार शिंदे. शेजारी मान्यवर. -- माणसाने माणसासाठी माणसासारखे जगावे -- डॉ. शिंदे : साक्रीत शारदोत्सव व्याख्यानमालेस सुरुवात; स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नांवर विचार सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. १३ : माणसाने माणसासाठी माणसाप्रमाणे जगले पाहिजे. धर्म माणसाला प्राणिमात्राच्या पातळीवरून उन्नत करून खऱ्या अर्थाने माणूस बनवतो आणि माणसामध्ये देवत्व पाहण्याची दृष्टी देतो, असे प्रतिपादन नंदुरबार येथील डॉ. शिरीषकुमार शिंदे यांनी केले. येथील श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या वतीने होणाऱ्या शारदोत्सव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘स्वामी विवेकानंदांचे स्वप्न’ या विषयावर गुंफताना ते बोलत होते. - वाचनालयाचे अध्यक्ष तथा तहसीलदार साहेबराव सोनवणे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जयवंतराव अहिरराव, डॉ. विजया अहिरराव, प्राचार्य बी. एस. पाटील, संजय देसले, उपाध्यक्ष सुरेश सोनवणे, कार्यवाह प्रा. व्ही. के. शाह, ॲड. नरेंद्र मराठे, सांस्कृतिक समितीप्रमुख प्राचार्य डॉ. लहू पवार, संचालक प्रा. डी. एन. खैरनार, प्रा. नरेंद्र तोरवणे, विजय भोसले, पी. झेड. कुवर, आर. पी. भामरे, जगदीश वाघ, प्रा. डॉ. प्रकाश साळुंखे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. सूर्यवंशी, डॉ. जैन, माजी प्राचार्य एस. डी. पाटील, व्ही. यू. मराठे, प्रा. सुधाकर नांद्रे, प्रा. एल. जी. सोनवणे, डी. डी. नांद्रे, प्राचार्य राजेंद्र अहिरे, डॉ. सचिन नांद्रे, ग्रंथपाल उज्वल अग्निहोत्री आदी उपस्थित होते. व्याख्यानापूर्वी मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती देवीच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. वाचनालयाचे उपाध्यक्ष सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक समितीप्रमुख पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. प्रकाश साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यवान श्रोत्याला ॲड. नरेंद्र मराठे यांच्यातर्फे पुस्तक भेट देण्यात आले. - ज्ञान हेच खरे सोने डॉ. शिंदे म्हणाले, दुधात साखर आणि फुलात सुगंध प्रत्यक्ष दिसत नसला तरी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते. त्याचप्रमाणे निसर्गातील विविध घटकांतून ईश्वराचे अस्तित्व ओळखावे, हीच रामकृष्ण परमहंस यांची शिकवण स्वामी विवेकानंदांनी जगाला दिली. रामकृष्ण परमहंस यांनी दिलेले ज्ञान हेच खरे सोने आहे. गुरु हा संत गोरा कुंभारासारखा असावा. संकटांना न घाबरता धाडसाने सामोरे गेले पाहिजे. भारतीय संस्कृतीत मनाच्या अभ्यासाला विशेष महत्त्व असून कर्मयोग, ज्ञानयोग आणि राजयोगाच्या अष्टांगांतून आत्मशिस्त, मानसिक स्थैर्य व आत्मोन्नतीचा मार्ग मिळतो, असे त्यांनी सांगितले. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, राज्यसभाही सोडली; राजकारणात खळबळ

दिल्लीत सहकाऱ्यांना बेड्या पडताच 'प्लान बी'; अभिजीत दीपके इनोव्हा कारने तडक पोहोचले शेतात

R ASHWIN: भुवनेश्वरने टीम इंडियात परतण्यासाठी नेमकं काय केलं? अश्विनने सांगितली महत्त्वाची गोष्ट; मोहम्मद शमीवरही मांडलं मत!

पुणे विद्यापाठीत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर, विद्यार्थींनींनी मध्यरात्री पोलीस स्टेशन गाठलं, काय घडलं?

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

SCROLL FOR NEXT