नाशिक

कोजागिरीवर ''स्वरांजली''ने नाशिक मंत्रमुग्ध

CD
पान चार ३३६५१ नाशिक : गंगापूर रोड येथील स्वरांजली संगीत संध्येत रसिकांशी संवाद साधताना पालकमंत्री गिरीश महाजन, सोबत आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार व इतर मान्यवर. ------------- कोजागरीवर ''स्वरांजली''ने नाशिक मंत्रमुग्ध सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २७ : कोजागरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गंगापूर रोडवरील शिवसत्य मैदानावर आमदार सीमा हिरे आणि तुळजाभवानी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ''स्वरांजली'' संगीत संध्या नाशिककरांसाठी अविस्मरणीय ठरली. या सोहळ्याला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विशेष उपस्थिती लावत आमदार सीमा हिरे यांच्या सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले. पालकमंत्री महाजन म्हणाले, आमदार हिरे नाशिककरांसाठी नेहमीच दर्जेदार सांस्कृतिक पर्वणी घेऊन येतात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला खानदेश महोत्सव, वैचारिक अधिष्ठान देणारी स्व. पोपटराव हिरे व्याख्यानमाला आणि दसऱ्यानिमित्त होणारे रावण दहन या उपक्रमांची नाशिककर वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. स्वरांजली सारख्या कार्यक्रमांमधून त्या शहराला कला, संगीत आणि संस्कृतीचा आनंद देत असून शहराच्या सांस्कृतिक परंपरेला ऊर्जा मिळत आहे. इंडियन आयडॉल फेम गायिका श्वेता दांडेकर, सुरभी गौड आणि गायक अर्जुन तांबे यांनी शास्त्रीय सुरांपासून ते आजच्या लोकप्रिय गीतांपर्यंत बहारदार सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमास भाजपचेमहेश हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावजी, योगेश हिरे, मनपा गटनेते ॲड. श्‍याम बडोदे, रश्मी हिरे, सभापती बाळकृष्ण शिरसाठ, समाधान देवरे, अभय छलानी, नगरसेवक सुरेश पाटील, स्वाती भामरे, उषा बेंडकोळी, प्रतिभा पवार, मानसी शेवरे, सोनाली भंदूरे, भगवान दोंदे, डॉ. वैभव महाले, गौरव बोडके, अशोक पवार, महेंद्र पाटील, यशवंत पवार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT