Vaman Khoskar inspecting the fire damage to Bhau Pardhi's house. esakal
नाशिक

Nashik News: पारधींच्या लेकीच्या लग्नाचा खर्च स्वराज्य संघटना करणार; आपदग्रस्त कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बिटूरली (ता. इगतपुरी) येथील भाऊ बुधा पारधी यांच्या घराला आग लागल्याने सर्व जीवनावश्यक वस्तूंसह लेकीच्या लग्नाचे सर्व साहित्य वा आर्थिक पुंजी आगीत भस्मसात झाली होती.

दरम्यान स्वराज्य संघटनेतर्फे लेकीच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलत अध्यक्ष नारायण भोसले, नारायण जाधव यासह सहकाऱ्यांनी मोठा आधार दिला. (Swaraj organization will pay for Pardhis daughters wedding Help flow to disaster affected family Nashik News)

जागृत नाशिक अभियानाचे प्रवर्तक स्वामी श्रीकंठानंद यांनीही मदतीचे आवाहन केले होते. त्याची दखल घेत नाशिक येथील जीवाधार सेवक संघाने भाऊ पारधी यांच्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंसह नवीन कपडे, चादर, ब्लॅंकेट, भाजीपाला, मिष्टान्न आदी साहित्य देत आदिवासी कुटुंबाची उमेद जागविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान आमदार हिरामण खोसकर यांच्या आदेशाने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी घराचा पंचनामा करून शासकीय मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. स्वीय सहायक वामन खोसकर यांनी आज नुकसानीची पाहणी केली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

रोटरी क्लबचे अध्यक्ष गोरख बोडके यांनी देखील आगीत भस्मसात झालेले साहित्य देत आपले सामाजिक दायित्व निभावले. ग्राफाईट कंपनी व मलबार हेबिटेड यांच्यातर्फे धर्मदाय निधीतून घर बांधण्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे.

जागृत नाशिकचे सदस्य सीताराम गावंडा, सरपंच किसन कुंदे, ग्रामसेविका ज्योती केदार, प्रहारचे सोपान परदेशी, स्वस्थ धान्य दुकानदार काशिनाथ आगीवले, विलास आगीवले आदी उपस्थित होते.

"गोंदे-वाडीवऱ्हे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांनी ग्रामीण आदिवासी मतदारसंघ परिसरात धर्मदाय निधीतून घरकुल, मूलभूत सुविधा प्राप्त करून देणे बंधनकारक आहे. मात्र हा हक्काचा निधी इतर राज्यात वळवला जात आहे." - हिरामण खोसकर, आमदार इगतपुरी- त्र्यंबकेश्वर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT