Sarpanch Sheetal Nandan esakal
नाशिक

Nashik News : ताहराबाद सरपंच शीतल नंदन ठरल्या अपात्र! भ्रष्टाचार तपासणी अहवालात सिद्ध

सकाळ वृत्तसेवा

ताहराबाद (जि. नाशिक) : ग्रामपंचायतीला विविध विकास कामांसाठी शासनाकडून आलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे तपासणी अहवालात सिद्ध झाल्याने सरपंच शीतल योगेश नंदन यांना सरपंच व सदस्य पदावरून अपात्र ठरवण्यात येत असल्याचा निर्णय विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला.

विभागीय आयुक्तांच्या या निर्णयाने पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. (Tahrabad Sarpanch Sheetal Nandan disqualified Proved in 14th Finance Commission Fund Corruption Probe Report nashik news)

भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेल्या ताहाराबाद ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये १४ व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये खोटी बिले सादर करून कामे न करता निधीचा अपहार झाला आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात निधीची अफरातफर आढळली होती. त्यामुळे याबाबत विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.

त्यामुळे या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांची तपासणी केली जात होती. तसेच यापूर्वी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका विद्यमान सरपंच शीतल योगेश नंदन यांच्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी करत त्यांच्या विरुद्ध जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

विभागीय आयुक्त कार्यालयात या तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीमध्ये सरपंच शीतल नंदन या दोषी आढळल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये सध्याच्या कार्यकालासाठी सरपंच व सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. तसा लेखी आदेश देखील बागलाण गटविकास अधिकारी, सरपंच शीतल नंदन व तक्रारदार यांना देण्यात आला आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

इतर सरपंचाचे धागे दणाणले

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील सरपंचांना अपात्र ठरलेल्यामुळे महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी दिलेल्या १४ व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये कामे करतांना चाकोरी बद्ध पध्दतीने करावी लागणार आहेत.

यापुर्वी झालेल्या कामांची विरोधक तक्रार करणार नाहीत याची काळजी सरपंचांना गावपातळीवर घ्यावी लागणार आहे. मात्र तालुक्यातील ताहाराबाद या मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना अपात्र ठरवल्यामुळे इतर गावांच्या सरपंचांचे धाबे दणाणले आहेत.

"गेल्या दोन वर्षांपासून सरपंचांच्या गैरकारभारा विरूद्ध वस्तूनिष्ठ तक्रारी सादर केल्या होत्या. न्याय देवतेवर विश्वास असल्यामुळे आम्हाला न्याय मिळाला."

- सुभाष नंदन, तक्रारदार तथा तालुकाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT