नाशिक

इगतपुरी : विजय पगारे : टाकेद येथे कृषी पंप विक्रीच्या दुकानात धाडसी चोरी : ४९ हजारांचा ऐवज लंपास

CD
०८९३९ सर्वतीर्थ टाकेद : येथील कृषी पंप विक्रीच्या दुकानाचे उचकटलेले शटर. ------------ ३०-२ टाकेदला कृषी पंपाचे दुकान फोडून चोरी ४९ हजारांचा ऐवज लंपास, नागरिकांत भिती सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता.१२ : सर्वतीर्थ टाकेद बुद्रुक येथे चोरट्यांनी कृषीपंप विक्री व दुरुस्तीच्या दुकानाचे शटर तोडून तब्बल ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घोटी पोलिसात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाकेद बुद्रुक येथील रहिवासी सागर रमाकांत खोल्लम (३०) यांचे सर्वतीर्थ रस्त्यासमोर ''भाग्यश्री मोटर्स'' नावाचे शेतीपंप विक्री व रिपेरिंगचे दुकान आहे. सकाळी सहाच्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी आले असता, शटरच्या कुलपाजवळ वाळू पडलेली व दोन्ही बाजूच्या लॉक पट्ट्या तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या. खोल्लम यांनी तात्काळ वडील रमाकांत खोल्लम व शेजारील दुकानदारांच्या मदतीने शटर उघडून पाहिले असता, दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आणि चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. दुकानाच्या भिंतीजवळ वायरचे रिकामे बॉक्स पडलेले आढळले. सागर खोल्लम यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार अंदाजे पाच लाख रुपयांच्या वस्तूंची चोरी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सर्रासपणे होणाऱ्या टाकेद परिसरातील वाढते चोरीचे प्रमाण व वाढती गुन्हेगारीवर घोटी पोलिसांकडून त्वरित नियंत्रण आणण्यात यावे अशी मागणी संपूर्ण परिसरातील नागरिकांकडून होत आहे. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईला उडवणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच, पुन्हा बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Novaya Gazeta: ६ पत्रकारांची हत्या, ३३ वर्षांचा संघर्ष; रशियातील शेवटचे मोठे स्वतंत्र वृत्तपत्रही बंद

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! राज्यात अवघ्या ७ महिन्यांत रस्ते अपघातात ९,१९५ जणांचा मृत्यू

Pune Cyber Crime: बनावट अटक वॉरंट, व्हिडिओ कॉल आणि धमक्या; पुण्यातील वृद्ध महिलेची 32 लाखांची फसवणूक

विनयभंगानंतर तरुणीला लोकलखाली ढकलल्याचा आरोप; नायगाव स्थानकातील धक्कादायक घटना|Naigaon | Mumbai news

SCROLL FOR NEXT