MNS esakal
नाशिक

बोगस डॉक्टरांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू : मनसे

संजिव निकम

नांदगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने (MNS) दिला आहे. तालुक्याचे आरोग्याधिकारी डाॅ. संतोष जगताप यांना मनसेने याबाबत निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, की नांदगाव तालुक्यात पदवी नसताना अथवा पात्रता नसताना जनरल प्रॅक्टीस करून रुग्णाच्या जिवाशी बोगस डॉक्टर खेळत आहेत. बोगस डॉक्टरांना (bogus Doctors) पेशटला इंजेक्शन देण्याचा अधिकार नाही. मात्र, बोगस डॉक्टर रुग्णाच्या जिवाशी खेळत आहेत. काही घाउक मेडिकल एजन्सीकडून बोगस डॉक्टर औषधे घेऊन जातात व निरागस, गरीब रुग्ण अथवा लोकांना चढ्या दराने माल विकतात. सध्या ४० ते ४१ अंश तापमान असताना, बोगस डॉक्टर औषधे सोबत घेऊन फिरतात. त्यामुळे औषधे खराब होऊन रुणाला त्रास होऊ शकतो. बोगस डॉक्टरचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.तालुक्यातील आरोग्य विभागाने निवेदनावनंतरही कारवाई केली नाही, तर मनसे स्टाईल आंदोलन करू, असा इशारा निवेदनात दिला आहे.

निवेदन देतेवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात, अभिषेक इघे, सतीश आहिरे, कुणाल सौंदाणे, विनोद पवार, गणेश चौधरी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT