On the occasion of the visit, Saili Palkhedkar, Mr. Golait, Ashlesha Bua, Milind Babar, Pallavi Ghule, Sameera Yewle etc esakal
नाशिक

‘त्या’ शिक्षकावर कारवाई करा : सायली पालखेडकर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मासिक पाळी असल्याचे कारण देत विद्यार्थिनीला वृक्षारोपणापासून वंचित ठेवणाऱ्या त्या शिक्षकावर कारवाई करावी, अशी मागणी राज्य बालहक्क आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांनी करत पुनश्च एकदा त्या विद्यार्थिनींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. (Take action against teacher who restrict student to plantation due to peiods Saili Palkhedkar satement Latest Marathi News)

याप्रकरणी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सायली पालखेडकर यांनी आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त श्री. गोलाईत यांची समक्ष भेट घेऊन प्राथमिक माहिती घेतली. त्यानंतर एनजीओचे अध्यक्ष आश्लेषा बुवा, बाल कल्याण समिती नाशिक अध्यक्ष मिलिंद बाबर, सदस्य पल्लवी घुले तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समीरा येवले यांच्यासह देवगाव आश्रमशाळेत भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

संबंधित मुलीच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण केले. सौ. पालखेडकर आणि त्यांच्या टीमने इतर विद्यार्थिनी सोबतदेखील संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. मुलींकरिता जेवण बरेचदा कच्चेच असते त्यामुळे मुलींना पोटदुखी त्रास होतो. त्याकरिता सदर बाबत लेखी तक्रार करण्याचे मुख्याध्यापकांना सूचित करण्यात आले.

भेटीत आढळल्या या त्रुटी

मुलींची राहण्याची खोली पाहता एका खोलीत ४९ मुली राहात असल्याचे दिसून आले. एका गादीवर दोन मुली झोपतात. तसेच फॅनची सोय नाही. अतिशय दाटीवाटीने मुली तेथे राहतात. याकरिता प्रत्येक रूममध्ये तीन फिरते फॅन त्वरित लावावे, असे मुख्याध्यापक व वसतिगृह अधीक्षक यांना निर्देश देण्यात आले.

आश्रमशाळेतील वसतिगृहात मुलींना स्नानासाठी गरम पाण्याची सोय नाही. सर्व मुली थंड पाण्याने अंघोळ करतात याबाबत मुलींकरिता असलेले सोलर तसेच गिझर त्वरित चालू करून घेण्यात यावे असेही निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले.

"सदर पीडित विद्यार्थिनी तसेच इतर मुलींच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही. याकरिता संबंधित शिक्षकावर योग्य ती कारवाई केली जावी, असे अपर आयुक्त श्री. गोलाईत यांना कळविण्यात आले. तसेच आश्रमशाळेत सांगितल्याप्रमाणे सुधारणा होत आहे की नाही, याकरिता पाठपुरावा करण्याचा मानस टीमने बोलून दाखवला आहे."

- सायली पालखेडकर , सदस्या, राज्य बालहक्क आयोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT