नाशिक

इगतपुरी : विजय पगारे : केंद्र शासनाच्या सुधारित वीज वितरण क्षेत्र योजनेतंर्गत (आर डी एस एस ) टाकेद गावाला मिळणार २४ तास थ्री फेज वीजपुरवठा :

CD
पान दोन ॲंकर -------------- 08872 घोटी : टाकेदला चोवीस तास थ्री फेज वीज पुरवठा नियमितपणे सुरळीत चालू करण्यात यावा या मागणीचे घोटी ग्रामीणचे सहाय्यक अभियंता नितीन गायकवाड यांना निवेदन देताना राम शिंदे. टाकेद गावाला २४ तास थ्री फेज वीजपुरवठा शासनाच्या सुधारित वीज वितरण क्षेत्र योजनेतंर्गत उपक्रम सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता.२८ : इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत टाकेद बु येथील वीज वितरणाच्या ग्राहकांना केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजने अंतर्गत (आरडीएसएस) गावठाण क्षेत्रात २४ तास थ्री फेज विद्युत पुरवठा चालू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत महावितरणाचे सहाय्यक अभियंता नितीन गायकवाड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील चार पाच दिवसांत ट्रायल घेऊन टाकेद गावाला नियमितपणे गावठाण थ्री फेज वीज पुरवठा चालू होईल अशी माहिती आहे. सदर योजनेचे कामकाज टाकेद परिसरात पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शेती क्षेत्राला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी थ्री-फेज वीज योजना राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील घरगुती ग्राहक आणि शेती पंप या दोघांनाही सुरळीत वीज देणे हा आहे. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर गावांमधील घरे,शाळा, रुग्णालये आणि लहान व्यवसायांना अखंडित २४ तास थ्री-फेज वीजपुरवठा होईल. यामुळे गावातील व्होल्टेजचा प्रश्न सुटणार, कमी व्होल्टेजमुळे शेतकऱ्यांचे मोटर पंप जळण्याचे प्रमाण कमी होईल, सौर ऊर्जेच्या जोडणीमुळे शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा सुरक्षित वीज मिळणे शक्य होत आहे. ग्रामीण भागातील पीठ गिरण्या,वेल्डिंग दुकाने किंवा इतर लघुउद्योगांना थ्री-फेज विजेसाठी ताटकळत राहावे लागणार नाही. केंद्र शासनाच्या आरडीएसएस योजनेचे काम पूर्ण झाले असून सध्या येत्या दोन चार दिवसांत ट्रायल घेऊन टाकेद गावठाण चोवीस तास थ्री फेज वीज पुरवठा नियमितपणे सुरळीत चालू करण्यात येईल याचा उद्योग व्यवसायिकांना सामान्य ग्राहकांना मोठा फायदा होईल. - नितीन गायकवाड,सहाय्यक अभियंता, वीज वितरण कंपनी, घोटी गेली अनेक महिन्यांपासून केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजने अंतर्गत टाकेद गावठाण विद्युत पुरवठा लाइनचे कामकाज चालू होते.सदर योजनेचे काम पूर्ण असताना सुद्धा संबंधित ठेकेदार एजन्सीच्या दिरंगाईमुळे ग्राहकांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाने त्वरित थ्री फेज गावठाण वीज पुरवठा चालू करावा व विजेचा लपंडाव थांबवावा. - राजेंद्र घोरपडे, ग्रामस्थ, टाकेद बु.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Marathi News Live Updates : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयाची आघाडी मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धाराशिवमध्ये जोरदार जल्लोष!

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT