Talathi Mhaske is arrested by anti corruption bureau nashik bribe crime news esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : लाचखोर तलाठी म्हस्के लाच लुचपतच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : इगतपुरी तालुक्यातील महसुली विभागातील तलाठी पदावर कार्यरत असलेले सचिन काशिनाथ म्हस्के (वय ३८; सजा सांजेगाव आणि मुरंबी ता.इगतपुरी) यांनी तक्रारदार यांच्याकडे महसुली ७/१२ अभिलेखावर नोंद करून देण्याच्या मोबदल्यात वीस हजार रुपये लाच स्वीकारल्याने लाच लुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाने गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. (Talathi Mhaske is arrested by anti corruption bureau nashik bribe crime news)

तक्रारदार व त्यांचे इतर ३ भागीदार यांनी मिळून इगतपुरी तालुक्यात मुरंबी गाव येथे जमीन खरेदी केली आहे.

सदर जमिनीच्या गाव नमुना ७/१२ महसूल अभिलेखावर् नोंद करून देण्याच्या मोबदल्यात लोकसेवक तलाठी सचिन म्हस्के यांनी वीस हजार रुपये लाचेची मागणी करून शनिवारी (ता.१) वीस हजार रुपये पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक संदीप घुगे, एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट

Team India New Coach: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम बदलली, आता कोचही बदलणार, गौतम गंभीरचा पत्ता कट ? नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Teachers Protest: महाराष्ट्रातील शिक्षक आक्रमक! ९ जुलैला शाळा बंद ठेवणार; आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन, कारण काय?

लग्नानंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार रिचा-अली; सोशल मीडियावर पोस्ट करत केली नव्या चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT