डॉ चंचल साबळे.jpg 
नाशिक

#Lockdown : 'लॉकडाउन'च्या अंधारावर उमटली चार चिमुकली पावले...'ते' देवदूतासारखे धावले मदतीला!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : एकीकडे अख्खे जग संकटात असताना दुसरीकडे मात्र माणुसकी जिवंत ठेवत दोन नव्या जीवांना जगात आणण्यासाठीची धडपड दिसून आली. चुंचाळे भागातील मजूर कुटुंबातील एका गर्भवतीला वेळेचे गांभीर्य ओळखून मागील कुठल्याही कागदपत्रांशिवाय साईसूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेत तिची सुखरूप प्रसूती करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत प्रसूतिकळा येत असताना रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी कोणतेही वाहन नव्हते. अशा वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी थेट शासकीय वाहनाच्या मदतीने गर्भवतीस जिल्हा रुग्णालयात पोचविले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत मिळालेल्या मदतीच्या हातांनी दोन्हीही घटनांत बाळ-बाळंतिणी सुखरूप आहेत. 

रिपोर्ट सोबत नसताना देखील हॉस्पिटलमध्ये दाखल 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाउन असताना मंगळवारी मध्यरात्री पावणेदोनला अंबडच्या चुंचाळे भागातील दत्तनगरमधील मजूर कुटुंबातील अमरिका शर्मा (वय 23) हिला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. मात्र सर्वत्र लॉकडाउनमुळे वाहने बंद असल्याने या महिलेला सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत पोचणे कठीण होते. साईसूर्या हॉस्पिटलच्या संचालिका आणि तनिष्का डॉक्‍टर्स फोरमच्या सदस्या डॉ. चंचल साबळे यांच्यापर्यंत माहिती पोचली. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे सावट असतानाही डॉ. चंचल साबळे यांनी मागील कागदपत्रे, सोनोग्राफीचे रिपोर्ट असे काहीही सोबत नसताना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले. काही मिनिटांतच या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला होता. 

कोणतेही बिल न घेता मोफत रुग्णसेवा

शुद्धीवर आल्यानंतर बाळंतीण व तिच्या कुटुंबीयांना डॉ. चंचल साबळे यांचे आभार कसे मानावेत, हेच कळत नव्हते. ताई, मी वर्षभर तुमच्याकडे काम करून तुमच्या बिलाची परतफेड करून देईन, तुम्ही माझ्या बाळाचा जीव वाचवला... असे म्हणत ती महिला हमसून हमसून रडली. डॉ. चंचल साबळे यांनी त्या महिलेच्या प्रसूतीचे कोणतेही बिल न घेता मोफत रुग्णसेवा दिल्याचे सांगितल्यावर मात्र शर्मा कुटुंबाचे अश्रू थांबत नव्हते. 

दुसरी घटना : पोलिस वाहनातून गर्भवती रुग्णालयात 

दुसऱ्या घटनेत वडाळा रोडवरील भारतनगर वसाहत परिसरातील शिवाजीवाडी येथे मंगळवारी (ता. 7) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गर्भवतीला प्रसूतिकळा सुरू झाल्या. असह्य वेदनेमुळे तत्काळ रुग्णालयात दाखल करणे आवश्‍यक होते. परंतु लॉकडाउनमुळे वाहन उपलब्ध होत नव्हते. एकीकडे लॉकडाउन, तर दुसरीकडे अशी अवघड परिस्थिती होती. त्या वेळी मुंबई नाका पोलिस ठाण्याचे विनयनगर बीट मार्शल पोलिस हवालदार संजय लाटे, पोलिस शिपाई अत्तार रात्रीच्या गस्तीवर होते. त्यांना याबाबतची माहिती समजल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ मुंबई नाका पोलिस ठाण्याशी संपर्क साधून मदत मागविली. हवालदार शिंदे, पोलिस शिपाई मुंजाळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ पोलिस शासकीय वाहनासह भारतनगर येथे पोचले. त्यांनी गर्भवतीस शासकीय वाहनातून तिच्या नातेवाइकांसह जिल्हा रुग्णालय गाठले. जिल्हा रुग्णालयात गर्भवतीला दाखल केल्यानंतर ती सुखरूप प्रसूत होऊन गोंडस बाळाला जन्म दिला. 

आयुक्तांकडून बक्षिशी 

मुंबई नाका पोलिसांनी मंगळवारी (ता. 7) रात्री दाखविलेल्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनीही केले. उपायुक्त अमोल तांबे यांनी लॉकडाउनच्या अतिरिक्त ताण असतानाही दाखविलेल्या माणुसकीचे दर्शन व कर्तव्यदक्षतेमुळे या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे रिवॉर्ड जाहीर केले. 

वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणे महत्त्वाचे असते. तनिष्का व्यासपीठाच्या निमित्तानेही नेहमीच सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. सध्या अंबड परिसरातील गरजू लोकांना मोफत भोजनाची व्यवस्था केली आहे. तनिष्का व्यासपीठाने दिलेला सामाजिक कार्याचा वसा नेहमीच पुढे नेणार आहोत. - डॉ. चंचल साबळे, तनिष्का व संचालिका साईसूर्या हॉस्पिटल, नाशिक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT