Cyber Security Sakal
नाशिक

IT Sector Career: विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता, AI मध्ये करिअरच्या संधी : तन्मय दीक्षित

‘सायबर फ्रॉड व करिअर करण्याची संधी’ विषयावर मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा

IT Sector Career : आताची तरुण पिढी आयटी क्षेत्रात प्रोगामिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी करीत आहे. मात्र, हेच काम करीत असताना त्यांना ओळख मिळत नाही, हे दुर्दैव आहे. तसेच, विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता, एआयमध्ये करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

विद्यार्थी फ्रीलान्स कामही करू शकतात, विद्यार्थ्यांचे कौशल्यच महत्त्वाचे असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कार विजेते तथा सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी व्यक्त केले. (Tanmay Dixit statement Cyber ​​Security for Students Career Opportunities in AI nashik)

सपकाळ नॉलेज हब येथे झालेल्या ‘सकाळ’- यिन केंद्रीय कॅबिनेट दोनदिवसीय पावसाळी अधिवेशनातील पहिल्या दिवसातील शेवटच्या सत्रात ‘सायबर फ्रॉड व करिअर करण्याची संधी’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

तन्मय दीक्षित म्हणाले, की एआय आणि मशिन लर्निंगच्या माध्यमातून सर्व्हिसेसचा वापर वाढला आहे. फोटो, ऑडिओच्या माध्यमातूनही फसविले जाऊ शकते, त्यामुळे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. ज्येष्ठांवरील सायबर हल्ले वाढले आहेत.

त्यांच्यात टेक्निकल साक्षरता कमी आहे. सायबर क्राईमच्या जाळ्यात किंवा ब्लॅकमेलिंगमध्ये अडकल्यास त्यांना टेक्नॉलॉजी वापरता येत नसल्याने जाळ्यात पटकन अडकतात. त्यांना बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाही. ज्येष्ठांनी सायबर साक्षर होऊन सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नॅशनल पोर्टलवर तक्रार नोंदवावी

आर्थिक फ्रॉडपासून बचाव ही काळाची गरज आहे. क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती बनावट संकेतस्थळावर अपलोड करू नका. संकेतस्थळे बनावट वाटत नसले, तरीही त्या सेफच आहेत, असे नाही. तुमचा वेब कॅमेरा सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.

सायबर क्राईम झाल्यास सर्वप्रथम तक्रार केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावरच द्यावी. तक्रार नॅशनल पोर्टलवर गेल्यास तेव्हा त्याचा तपास जलदगतीने होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mahayuti Manifesto : महायुतीचा वचननामा जाहीर; मराठी माणसाला मुंबईतच घर ते बेस्ट प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत अन् बरंच काही...

Pune News: मांढरदेवीच्या यात्रेला अभूतपूर्व गर्दी; भोर मार्गावर दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, दाेन्ही बाजुला वाहतूक जाम!

Ankita Bhandari Murder : काय आहे अंकिता भंडारी खून प्रकरण? मुख्यमंत्र्यांनी दिले CBI चौकशीचे आदेश; जुन्या जखमा आणि नवा वाद!

Rhino Attacks Tiger : वाघाच्या जबड्यातून पिल्लाची सुटका! दुधवा जंगलात गेंड्याच्या मादीचा वाघावर थरारक हल्ला; दुर्मिळ दृश्य video viral!

Black Saree Look: काळ्या साडीतला बॉलिवूड टच देईल तुम्हाला एलिगंट अन् रॉयल लूक, कौतुक नक्की मिळेल!

SCROLL FOR NEXT