नाशिक

तन्मय पाटीलचे यश

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H33575 धुळे : राष्ट्रीय शालेय वूशू स्पर्धेतील रौप्यपदक विजेता तन्मय पाटील याच्यासमवेत मुख्य प्रशिक्षक राहुल बर्वे, प्रशिक्षिका अनुराधा चौधरी, शिक्षक समाधान भामरे. --- राष्ट्रीय शालेय वूशू स्पर्धेत तन्मय पाटीलची रौप्यभरारी --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २६ : जम्मू- काश्मीरमधील श्रीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय वूशू स्पर्धेत धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथील राजश्री शाहू छत्रपती (आरएससी) विद्यालयाच्या तन्मय पाटील याने रौप्यपदकाची कमाई केली. १७ वर्षांखालील ४५ किलो वजनी गटात तन्मयने केलेली ही दमदार कामगिरी धुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातून रौप्यपदक पटकावणारा तन्मय एकमेव खेळाडू ठरला. तन्मयने जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय शालेय वूशू स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची मालिका कायम राखत राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळविला होता. राष्ट्रीय स्तरावरही त्याने आक्रमकता, चपळाई, अचूक तंत्र आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर दिली. पंजाब, आसाम, हरियाणा आणि मणिपूर या राज्यांतील खेळाडूंविरुद्ध प्रभावी खेळ करत त्याने अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात यजमान जम्मू-काश्मीरच्या प्रतिस्पर्ध्याशी त्याची अटीतटीची लढत झाली. या चुरशीच्या मुकाबल्यात तन्मयने रौप्यपदकावर आपले नाव कोरले. तन्मयच्या या यशामागे धुळे वूशू असोसिएशनचे सचिव तथा मॉन्स्टर फाईट क्लबचे संचालक व मुख्य प्रशिक्षक राहुल डी. बर्वे, प्रशिक्षिका अनुराधा चौधरी आणि विद्यालयाचे शिक्षक समाधान भामरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तन्मयच्या या राष्ट्रीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण पाटील, संचालक मिलिंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या मीनल पाटील, विद्यालयाचे प्राचार्य विलास पवार आणि उपमुख्याध्यापक जीवन भामरे यांच्यासह शिक्षक, क्रीडाप्रेमी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे कौतुक केले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flex-Fuel: पेट्रोलशिवायही धावणार तुमची कार! केंद्र सरकारची E100 इंधनाला मंजुरी

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे अपडेट्स! केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी काय महत्त्वाचं?

Thane News: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! श्रमजीवीच्या मोर्चामुळे वाहतुकीत बदल, अनेक रस्ते बंद; काय असतील पर्यायी मार्ग?

Breast Cancer: पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; 'या' बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra Live News: छत्रपती कारखान्याचे १५ दिवसात १ लाख ७३५३ टन उसाचे गाळप

SCROLL FOR NEXT