नाशिक

विरचक प्रकल्पात सोडणार तापी-बुराईचे पाणी

CD
NSK26H32296 मुंबई : मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीला उपस्थित जलसंपदामंत्री गिरीश महाजन, विपणन मंत्री जयकुमार रावल, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्‍या पाडवी. --- वीरचक प्रकल्पात आणणार तापी-बुराईचे पाणी -- अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश; आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा पाठपुरावा सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १३ : शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नंदुरबाच्या वीरचक प्रकल्पात तापी-बुराई प्रकल्पाचे पाणी आणण्याचा निर्णय मंत्रालयात मंगळवारी (ता. १३) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी होते. बैठकीत याबाबतचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे नंदुरबार शहराच्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. याबाबत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पाठपुरावा केला होता. मंत्रालयात झालेल्या बैठकीला पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तापी-बुराई प्रकल्पाचे पाणी बुराई नदीकडे वळविताना त्याच पाण्यातून ठाणेपाडा धरणही भरून घ्यावे, अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बैठकीत केली. या मागणीची दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यामुळे ठाणेपाडा धरणाच्या पाणीप्रश्न सुटणार आहे. निंभेल, आसाणे, शनिमांडळ धरणांतही तापीचे पाणी नंदुरबार तालुक्यातील निंभेल, आसाणे आणि शनिमांडळ या गावांमधील धरणांमध्येही तापी-बुराई प्रकल्पाचे पाणी लवकरात लवकर आणून स्थानिक पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी संबंधित योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यावर चर्चा झाली. बिलाडी धरणग्रस्तांना घरकुल बिलाडी धरणामुळे बाधित झालेल्या खामगाव येथील आदिवासी कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. या कुटुंबांना शबरी घरकुल योजनेतून घरे उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT