नाशिक

तपोवन वृक्षतोड प्रकरणी २५ जानेवारी तर जिल्ह्यातील वृक्षतोडीवर २५ नोव्हेंबरला सुनावणी!

CD
तपोवन वृक्षतोडप्रकरणी २५ जानेवारीस सुनावणी जिल्ह्यातील वृक्षतोडीवर २५ ला सुनावणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.४ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीसह नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतील वृक्षतोडीचा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादात अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. या दोन्ही प्रकरणांचा निकाल अद्याप लागलेला नसून तपोवनातील वृक्षतोड प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जानेवारी २०२७ ला तर जिल्ह्यातील वृक्षतोडीसंदर्भातील दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे. अनेक सुनावण्या, अंतरिम आदेश आणि प्रतिवाद्यांचे म्हणणे यानंतरही अंतिम निर्णयाची प्रतीक्षा कायम असल्याने नाशिकच्या पर्यावरणाच्या दृष्टीने या सुनावण्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सिंहस्थासाठी तपोवनात साधुग्राम आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड प्रस्तावित करण्यात आली होती. त्याला पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी तीव्र विरोध केला. या प्रकरणात ॲड. श्रीराम पिंगळे यांनी हरित लवादात याचिका दाखल केली. वृक्षतोडीपूर्वी कायदेशीर प्रक्रिया, वृक्षगणना, सार्वजनिक सूचना आणि हरकतींचा विचार झालेला नाही, असे आक्षेप याचिकेत घेण्यात आले. डिसेंबर २०२५ मध्ये लवादाने वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती देत वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला होता. त्यानंतर तपोवनासह इतर ठिकाणांची पाहणी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीही नियुक्त करण्यात आली. पर्यावरणप्रेमी मनीष बाविस्कर यांनीही नाशिक महापालिकेच्या वृक्षतोडीच्या नोटिसांना आव्हान देणारी स्वतंत्र याचिका दाखल केली. ७ एप्रिल २०२६ ला हरित लवादाने अनेक नोटिसांमध्ये वृक्षांची संख्या, प्रजाती आणि तोडीची कारणे स्पष्ट नसल्याचे निरीक्षण नोंदवत शहरातील वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती दिली. महापालिकेने स्थगिती उठविण्याची मागणी केली; मात्र लवादाने ती तातडीने मान्य केली नाही. अत्यावश्यक परिस्थितीत वृक्षतोडीसाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची तरतूद केली. सर्वोच्च न्यायालयात ॲड. श्रीराम पिंगळे यांच्यामार्फत याचिकाकर्त्यांची बाजू मांडली जात असून नाशिक महापालिकेला या प्रकरणांत आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambani family Diwali Celebration : सासू-सुनेचा असा राजेशाही अंदाज कधी पाहिला नसेल! एका बाजूला लाल सिल्क साडी, तर दुसऱ्या बाजूला जांभळा ड्रेस; फॅशन पाहून चाहते थक्क

Pune News: चौकशी यादीतून राज्यसेवा परीक्षा वगळली; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यादी जाहीर; 'या' परीक्षांची होणार चौकशी?

Festive Inflation: दिवाळीपूर्वी 'अमूल'चा ग्राहकांना दणका, तूप-बटर महागले; काय आहेत नवे दर?

Latest Marathi News Live Update : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी !

Eknath Shinde Sanatan Martand Award : वाराणसी येथील 'संस्कृती संसद २०२६' मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च 'सनातन मार्तंड' पुरस्कार प्रदान

SCROLL FOR NEXT