टीसीएस लोगो वापरणे
-------------
इम्तियाज जलिल यांचा जबाब नोंदविला
------------
संशयितांचा आकडा ११ पर्यत, १९ ला सुनावणी होणार
-----------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : बहुचर्चित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीतील युवतीवरील अत्याचार, विनयभंग, धर्मांतराचा प्रयत्न आणि ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांचा या प्रकरणात नाव समोर आल्याने त्यांच्यासमोरील अडचणीत भर पडली आहे. दरम्यान, अत्यंत गोपनीयरित्या शहर गुन्हेशाखेच्या जलिल यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयितांचा आकडा ११ पर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाची येत्या १९ नोव्हेंबरला सुनावणी आहे.
टीसीएस कंपनीतील अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्नासह विविध गंभीर कलमान्वये देवळाली कॅम्प पोलिसात एक तर, मुंबई नाका पोलिसा आठ असे एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांची एकत्रित सुनावणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने (एसआयटी) नवीन सहसंशयित ५ ते ११ यांच्याविरोधात नव्याने पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे. यात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यापूर्वीच पोलिसांनी संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतिन पटेल याचा सह संशयित करून कसून चौकशी केली आहे. तपासादरम्यान, एसआयटीने तांत्रिक विश्लेषण, काॅल डिटेल्स, आणि इतर फॉरेन्सिक अहवाल प्राप्त केले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच नाशिक एसआयटीचे प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी जलील यांना नाेटीस बजावून चौकशी केली होती. त्यानंतर त्यांचा जबाबही नोंदवून घेण्यात आला आहे.
१६-१
टीसीएस गुन्ह्यातील संशयित
दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल, हानिफ खान,निदाचे वडील एजाज बशिर खान, निदाची आईनिलोफर एजाज खान, निदाचा भाऊ मोहम्मद एजाज खान, निदाची मावशी नुरजहाँ शेख, एमआयएमचे माजजी खासदार इम्तियाज जलील, सादिक बशिर खान.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.