नाशिक

टीसीएस प्रकरणाची नियमित सुनावणीला प्रारंभ

CD
टीसीएस प्रकरणाची सुनावणी आता एकाच न्यायालयात दानिश शेखची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी; पुढील सुनावणी १९ ऑक्टोबरला सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : राज्यभर गाजलेल्या टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतराचा प्रयत्न व लैंगिक अत्याचार प्रकरणातील खटल्याची नियमित सुनावणी सोमवारी (ता. १२) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. मुख्य संशयित दानिश शेख याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले, तर तौसिफ अत्तार, निदा खान आणि मतीन पटेल हे न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित होते. युक्तिवादानंतर पुढील सुनावणी १९ ऑक्टोबरला होणार आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत आरोप आहेत. विशेष तपास पथकाने (एसआयटी) धर्मांतराचा कट रचल्याचा संशय व्यक्त करत पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. कंपनीतील तरुणींना जाळ्यात ओढून एका तरुणीवर बलात्कार, अन्य पीडितांचा विनयभंग आणि एका तरुणाच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आल्याचे नमूद आहे. या प्रकरणातील नऊ गुन्ह्यांपैकी सहा खटल्यांत दोषनिश्चितीपूर्वीचे युक्तिवाद सुरू आहेत. त्यापैकी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यातील खटला यापूर्वी नाशिकरोड सत्र न्यायालयात सुरू होता. मात्र, नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या आदेशानुसार हा खटला अन्य खटल्यांशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित खटल्यांची सुनावणी आता एकाच न्यायालयात होणार आहे. या प्रकरणातील संशयितांमध्ये दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, आसिफ अन्सारी, शफी शेख, कंपनीच्या असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी, छत्रपती संभाजीनगरातील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आणि हानिफ शेख यांचा समावेश आहे.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT