टीसीएस लैंगिक शोषणाच्या
खटल्यांची एकत्रित सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : राज्यभर गाजलेल्या नाशिक टीसीएस महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक अत्याचारासह विनयभंग, धर्मांतराचा प्रयत्न व ॲट्रोसिटी अन्वये दाखल आठही गुन्ह्यांची सुनावणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात एकत्रित घेतली जाणार आहे. प्रधान न्यायधीशांच्या आदेशान्वये सदरील खटले नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयातून या खटल्यांचे हस्तांतरण करण्यात आले.
टीसीएस कंपनीतील पीडित महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक शोषण करीत, त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी नऊ गुन्हे दाखल झाले. यातील एक गुन्हा देवळाली कॅम्प तर आठ गुन्हे मुंबई नाका पोलिसात दाखल आहेत. मुंबई नाका पोलिस ठाण्यातील लैंगिक शोषण व धर्मांतराचा प्रयत्न केल्या प्रकरणात निदा खान, दानिश शेख, आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, अश्विनी चैनानी यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यांत भारतीय न्याय संहिता, ॲट्राेसिटी ॲक्ट व भारतीय दंड विधान कलमानुसार गुन्हेगारी कट रचणे, बलात्कार, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे आदीचा समावेश आहे.
दरम्यान, ॲट्रोसिटीचा खटला व अन्य सात खटल्यांमध्ये तांत्रिक आणि डिजिटल पुरावे एकाच न्यायालयात सादर होऊन एकत्रित सुनावणी होईल. यामुळे डिजिटल पुराव्यांची तपासणी आणि साक्षीदारांची साक्ष एकाच टप्प्यात पूर्ण होण्यास मदत होणार आहे. नाशिकचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या २९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने हस्तांतरणाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, या खटल्यांशी संबंधित सर्व मूळ दस्तऐवज, पेन ड्राईव्ह आणि अन्य जप्त मुद्देमाल जिल्हा न्यायालयात जमा करण्याचे निर्देश, तसेच सीआयएस प्रणालीमध्ये हे प्रकरण वर्ग झाल्याने त्याची नोंद घेण्याचे निर्देश न्यायालयाच्या अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.