Teacher 25 thousand rupees help to accident student nashik news esakal
नाशिक

Nashik News : अपघातग्रस्त विद्यार्थ्यास शिक्षकांचा मदतीचा हात; ग्रामस्थांनी जमवले 60 हजार..

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची धडपड असते. या धडपडीला बळ देण्याचे काम गुरुजन करतात. शिक्षणाच्या धावपळीत लेंडाणे (ता.मालेगाव) येथील दयाराम जगन्नाथ काळे या विद्यार्थ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात झाला. (Teacher 25 thousand rupees help to accident student nashik news)

अतिशय गरीब परिस्थिती असलेल्या मसगा कनिष्ठ महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस 'गुरुजनांनी' पंचवीस हजार रुपयांची मदत देत माणुसकीचा बोध समाजात निर्माण केला.

दयाराम याला अपघातात मोठ्या प्रमाणावर मार लागल्याने नाशिकच्या 'मविप्र' मेडिकल कॉलेजमध्ये उपचार केल्यानंतर थोडीशी सुधारणा झाली. ऐन परीक्षेच्या काळात अपघात झाल्याने परीक्षेपासून वंचित राहिला. हलाखीच्या परिस्थितीची शिक्षकांना जाणीव असल्याने सर्वांनी एकत्र येत शक्य ती मदत करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

दरम्यान अपघातानंतर ग्रामस्थांनी साठ हजार रुपये या लेकरासाठी वर्गणी करून इथपर्यंत दवाखान्याचा खर्च केला. अपघातात दयाराम याच्या पाठीचा कण्यावर इजा झाल्यामुळे मानेपासून खाली सर्व शरीरात संवेदना नष्ट झाल्या आहेत. परिणामी अडीच महिन्यापासून तो अंथरुणाला खिळून आहे. शस्त्रक्रिया खूपच गुंतागुंतीची आणि खर्चिक असल्यामुळे पुढील उपचार आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे बंद आहे.

दयाराम याच्या वडिलांचा मृत्यू झालेला असून आई मोलमजुरी करते. उत्पन्नाचे शेती किंवा इतर कुठल्याही प्रकारचे साधन नाही. अशावेळी या शिष्याला गुरुजनांचा आधार महत्त्वाचा असला तरी त्यावर कायमस्वरूपी उपचार होण्याची गरज आहे.

समाजातील दानशूर घटक वा सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी लेंडाणे ग्रामस्थांनी केली आहे. मदतीसाठी दानशूरांनी राधा जगन्नाथ काळे यांच्या बँक खात्यावर (२५०१८८७९६४३, आयएफसीकोड MAHB०००१०२७) मदत करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT