voter registration Esakal
नाशिक

Teacher Constituency Election: उत्तर महाराष्ट्रात 16 हजार मतदार नोंदणी; जळगाव जिल्ह्याची आघाडी, नंदुरबार मागे

महाराष्ट्रातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकेसाठी उत्तर महाराष्ट्रात 16 हजार मतदार नोंदणी; जळगाव जिल्ह्याची आघाडी, नंदुरबार मागे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आठ महिन्यांनी होणार असली, तरी मतदार नोंदणीकडे इच्छुक उमेदवार सध्या नजर ठेवून आहेत.

नाशिक विभागात येणाऱ्या पाच जिल्ह्यांत सध्या १५ हजार ७१४ मतदारांची नोंदणी झाली असून, जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी झाल्याचे चित्र आहे. (Teacher Constituency Election 16 thousand voter registration in North Maharashtra Jalgaon district lead Nandurbar behind nashik)

नोव्हेंबर २०२३ च्या अगोदर सहा वर्षांत तीन वर्षे अध्यापनाचे काम केलेले असल्यास निवृत्त शिक्षकांना मतदार नोंदणी करता येणार आहे. शिक्षक लगतच्या सहा वर्षांत निवृत्त झाले असतील; परंतु त्यांचा लगतच्या सहा वर्षांपैकी तीन वर्षांचा अध्यापनाचा काळ पूर्ण झालेला असेल तर असे निवृत्त शिक्षकही मतदार नोंदणीस पात्र राहू शकतात.

म्हणून १ नोव्हेंबर २०२३ च्या आधी तीन वर्षे निवृत्त झालेल्या शिक्षकांचा नोंदणीकडे कल जास्त असल्याचे दिसून आले. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांमध्ये आणि ५४ तालुक्यांमध्ये शिक्षक मतदारसंघात निवडणूक होणार आहे.

आकडे बोलतात...

नाशिक : १,४८१

धुळे : २,६७८

जळगाव : ६,८६२

नंदुरबार : १,०६३

अहमदनगर : ३,६३०

नाशिक मतदारसंघात येणाऱ्या काळात कोणत्या जिल्ह्यातील मतदार कसा नोंदविला जातो, यावर शिक्षक मतदारसंघाच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या तहसील कार्यालयात मतदार नोंदणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली असून, एकगठ्ठा, पॉकेट वोट नोंदविण्याकडे इच्छुकांचा कल आहे.

दरम्यान, इच्छुकांमध्ये महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार किशोर दराडे, संदीप गुळवे, शिक्षक भारतीकडून अर्जुन कोकाटे, भाजपकडून अनिकेत पाटील, ‘टीडीएफ’चे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे यांनी मतदार नोंदणीसाठी यंत्रणा कामाला लावलेली आहे.

"सहा वर्षांपैकी तीन वर्षे अध्यापन झालेले असल्यास शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात. यात सलग अध्यापन केलेले नसेल, तरी चालेल. मात्र, तीन वर्षे अध्यापन असायला हवे. यासाठी शासनाने पाचही जिल्ह्यांत यंत्रणा कार्यान्वित केली आहे."

- रमेश काळे, महसूल उपायुक्त तथा निवडणूक अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Satara Accident: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे! बनपुरीजवळ दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक; १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT