जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक कैलास बच्छाव यांनी रस्त्यात सापडलेला धनादेश पिंपळनेर येथील हस्ती बँकेचे शाखाधिकारी जी. एम. बोरसे यांच्याकडे सुपूर्द केला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक कैलास बच्छाव यांनी रस्त्यात सापडलेला धनादेश पिंपळनेर येथील हस्ती बँकेचे शाखाधिकारी जी. एम. बोरसे यांच्याकडे सुपूर्द केला. esakal
नाशिक

सापडलेला धनादेश परत करत शिक्षकाने घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन

प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : ‘काळ बदलालाय... आता कोण प्रामाणिक राहिलंय’ असा सूर अनेकवेळा ऐकायला मिळतो. परंतु, आजच्या जमान्यातही प्रामाणिकपणा, माणुसकी टिकून आहे. याची प्रचिती देणारे उदाहरण पिंपळनेर येथील उपक्रमशील प्राथमिक शिक्षकाच्या कृतीतून समोर आले आहे.

रस्त्यावर सापडलेला २४ हजार रुपयांचा बेअरर धनादेश बँक प्रशासनास परत करून त्यांनी चांगुलपणाचे दर्शन घडविले. चिंचदर (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पिंपळनेर (ता. साक्री) आपल्या मूळगावी वास्तव्यास आहेत.

आपल्या खासगी कामानिमित्त सामोडे रस्त्याने जात असताना त्यांना २४ हजार रुपये मूल्याचा हस्ती बँकेचा जे. टी. ऑटोमोबाईल नावाचा बेअरर चेक सापडला. त्यानंतर त्यांनी तातडीने चेक सोबत घेवून हस्ती बँक गाठत संबंधित शाखाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शाखाधिकारी जी. एम. बोरसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शिक्षक डी. डी. महाले, शिरीष बिरारीस आदी उपस्थित होते. कैलास बच्छाव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यूजक्लिकच्या संपादकांची अटक अन् कोठडी अवैध; सुप्रीम कोर्टाने दिले सुटकेचे आदेश

Fact Check: मुंबईतील भाजपच्या निवडणूक किटमध्ये 'गोल्ड बिस्किटे' नव्हती; खोट्या दाव्यासह फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने संपवलं जीवन; जळगावच्या जामनेर येथील घटना

lok sabha result: "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..."; लोकसभेच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय घोषित

Latest Marathi News Live Update : राजस्थान खाणीत १४ पैकी १० जणांना बाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT