नाशिक

पवित्रच्या भरतीतून नाशिकला मिळणार ९०० शिक्षक!

CD
पान-५ ---------------- ३६-२ पवित्र पोर्टलच्या भरतीसाठी आजपासून मुलाखती सुरू --------------- जिल्ह्यास मिळणार नऊशे शिक्षक ----------- संतोष विंचू / सकाळ वृत्तसेवा येवला, ता.२ : शिक्षक, पदवीधर शिक्षक निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पवित्र प्रणालीमार्फत रखडलेल्या खासगी अनुदानित संस्थांच्या शिक्षक भरतीला चालना मिळाली आहे. गुणवत्तेनिहाय पात्र विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आली असून उद्यापासून (ता.३ ) ते २५ नोव्हेंबरपर्यंत मुलाखत प्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षक नियुक्ती होणार आहे. या अंतर्गत नाशिक विभागाला १८५० तर जिल्ह्यासाठी सुमारे ९०० शिक्षक विविध शाळांना मिळणार आहे. शिफारस झालेल्या उमेदवारांच्या मुलाखत आणि अध्यापन कौशल्याची प्रक्रिया ३ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. --------- यावर्षी शिक्षक शिक्षण विभागाने ३०,२०९ पदांसाठी मेगाभरतीची घोषणा केली होती. यात मुलाखतीशिवाय थेट निवड ऑगस्टमध्ये होऊन जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि खासगी शाळांमध्ये १३ हजार ११९ रिक्त जागांसाठी थेट निवड यादी प्रसिद्ध करण्यात भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त जागांसाठी ‘मुलाखतीसह नियुक्ती’ या पर्यायाची नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. या फेरीत १०,३२८ रिक्त जागांसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्याकरिता तब्बल ११,४९३ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या भरतीतून जिल्ह्यातील विविध संस्थांना ८८३, जळगावमध्ये ४९६ तर धुळ्यात ५३७ शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. यामुळे शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळणार असून नोकरीच्या प्रतीक्षेतील तरुणांना सरकारी नोकरीची स्वप्नपूर्ती होणार आहे. ----------- कोट पवित्र पोर्टलमुळे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून नोकरी मिळत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व रिक्त पदांची वेळेत भरती करण्यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे व शासन सकारात्मक आहे. शिक्षक आमदार म्हणून आमचाही पाठपुरावा सुरूच असतो. - किशोर दराडे,शिक्षक आमदार,नाशिक ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update: शरद पवार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली हेल्थ अपडेट

विजय शंकरसह ३ भारतीय खेळाडू खेळणार Afghanistan Premier League? ड्राफ्टमध्ये २९ पाकिस्तानी अन् १० बांगलादेशी खेळाडूंचाही समावेश

Latest Marathi News Live Update : तुकाराम मुंढेंनी पुण्यात केली दिवाळी फराळाची तपासणी; लाडू हाताने कुस्करला अन्...

'महाराजांचे गडकिल्ले, जंगलं आणि डोंगर धोक्यात'; सयाजी शिंदेंचा संतापले, सह्याद्री वाचवण्यासाठी सुरू केली मोठी चळवळ

''उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांचा विवाह शरिया कायद्यानुसार बेकायदेशीर'', 'ऑल इंडिया मुस्लिम जमात'चा आक्षेप

SCROLL FOR NEXT