Mobile Theft esakal
नाशिक

Nashik Crime: शिक्षकच मोबाईल चोरतो तेव्हा...! कार्यालयातील CCTVत चोरीचा प्रकार कैद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : शिक्षकांमुळेच मुलांना चांगल्या वर्तणुकीचे धडे मिळत असल्याने आजही शिक्षकांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन चांगला आहे. शिक्षकांना चांगले वेतनही असतानाही काही शिक्षक मात्र आपल्या कर्तव्याशी प्रतारणा करताना दिसतात.

आज तर एका शिक्षकाने मुंबई नाका परिसरात असलेल्या अधीक्षक, माध्यमिक वेतन व भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात कामानिमित्त आला असता, तेथील लिपिक महिलेचा मोबाईलच चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या शिक्षकाचा मोबाईल चोरी करतानाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. (teacher steals mobile theft caught on CCTV in office Nashik Crime)

रवींद्र पवार, असे मोबाईल चोरणाऱ्या शिक्षकांचे नाव असून, तो नांदगाव येथील एका खासगी शाळेत उपशिक्षक आहे. महामार्गावरील व्होकार्ट हॉस्पिटलसमोर असलेल्या अधीक्षक, माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात श्रीमती मीनल बावणे या वरिष्ठ लिपिक आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून या कार्यालयात माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे बँक खाते शालार्थमध्ये अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी (ता. १६) नांदगाव येथील कै. भागाबाई वामन हिरे माध्यमिक विद्यालय, कळमदरी या शाळेचे उपशिक्षक संशयित रवींद्र पवार हे कार्यालयात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्रीमती बावणे या कामकाज करीत असताना त्यांचा मोबाईल टेबल होता. त्या वेळी संशयित पवार याने श्रीमती बावणे यांचा मोबाईल त्यांची नजर चुकवून उचलला आणि मोबाईल स्वीचऑफ करून चोरून करून घेऊन गेला.

मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच श्रीमती बावणे यांनी अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली. त्यानुसार कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये संशयित पवार हा मोबाईल चोरताना आढळून आला.

याप्रकरणी अधीक्षकांमार्फत मुंबई नाका पोलिसात तक्रार करण्यात आली असून, याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus: एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार? निधी देण्यास सरकारचा नकार, नेमकं कारण काय?

Beed : गोदावरीत ६० जणांसह बोट उलटली, २० भाविकांना बाहेर काढलं; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Video : हॉस्पिटलमधून बाहेर पडताना ढसाढसा रडला सलमान ; जवळच्या मैत्रिणीचं झालं निधन

PMC Bomb Threat : पुणे महापौर कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, शहरात खळबळ; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Asian Games 2026: भारताचा संघ पाहून पाकिस्तानी घाबरले... बाबर आझम, शाहिन आफ्रिदी यांना डच्चू; कर्णधारही बदलला...

SCROLL FOR NEXT