Teacher MLA Kishore Darade speaking at the Teachers' Durbar held at CMCS College on Friday
Teacher MLA Kishore Darade speaking at the Teachers' Durbar held at CMCS College on Friday esakal
नाशिक

Nashik News : शालार्थ आयडीवरून गाजला शिक्षकदरबार! शिक्षक, संघटना पदाधिकारी आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शालार्थ आयडी प्राप्त करुन घेण्यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून हिन वागणूक दिली जाते. अनेक वेळा फाईल सापडत नसल्‍याचे उत्तर दिले जाते, यासह अन्‍य विविध तक्रारींचा पाढा शिक्षक, शिक्षक संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांनी वाचला.

यानंतर शालार्थ आयडीचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी शिबिर घेणार असल्‍याचे सांगत याबाबत नियोजन करण्याच्‍या सूचना आमदार किशोर दराडे यांनी अधिकार्यांना दिल्‍या. (teachers court became popular over school ID Teachers union officials aggressive Nashik News)

गंगापूर रोडवरील सीएमसीएस महाविद्यालयात शुक्रवारी (ता.२४) शिक्षक दरबार या उपक्रमाचे आयोजन केले होते. शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब चव्‍हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भगवान फुलारी, वेतन पथक (माध्यमिक)चे अधीक्षक उदय देवरे, वेतन पथक (प्राथमिक) चे अधीक्षक गणेश फुलसुंदर आदी उपस्‍थित होते.

उपस्‍थित शिक्षकांनी सुरवातीपासून शालार्थ आयडीचा विषय लाऊन धरताना कर्मचार्यांकडून मिळणार्या वागणूकीबाबत नाराजी व्‍यक्‍त केली. संबधित कर्मचार्यांची उच्च स्‍तरीय चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

त्‍यानुसार याबाबत चौकशी करून आमदार दराडे यांना अहवाल सादर करणार असल्‍याचे शिक्षण उपसंचालक डॉ. चव्‍हाण यांनी जाहीर केले. शालार्थ आयडीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शिबिर घेण्याबाबत आमदार दराडे यांनी सूचना केल्‍या. मोहन चकोर यांनी सूत्रसंचालन व विषयपत्रिका वाचन केले.

इतिवृत्तावरुन खडसावले

मागील शिक्षक दरबारातील इतिवृत्ताबाबतची विचारणा आमदार दराडे यांनी केली. परंतु अहवाल उपलब्‍ध नसल्‍याचे समजताच त्‍यांनी उपस्‍थित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. यंदाच्‍या शिक्षक दरबारापासून सर्व बाबींच्‍या नोंदी घेऊन पुढील दरबारात केलेल्‍या कार्यवाहीबाबत तपशीलवार माहिती देण्याच्‍या सूचना त्‍यांनी केल्‍या.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

याविषयांवर झाली चर्चा

नाशिक विभागातील प्रयोगशाळा सहायकांना इतर विभागांप्रमाणे वेतनश्रेणी देण्याची मागणी करण्यात आली. सेवानिवृत्त प्रकरणाबाबत दिरंगाई, शालार्थ आयडी देणेबाबत दिरंगाई, नियमित शिक्षकांच्‍या प्रलंबित पगारावर चर्चा करण्यात आली.

सातव्‍या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता मिळण्यासह वैद्यकीय बिलांमध्ये होणारी कपात कुठल्‍या आधारे केली जाते, यावर उपस्‍थित शिक्षकांनी बोट ठेवला.

जुन्‍या पेन्‍शनसाठी एकत्र या ः दराडे

जुनी पेन्‍शन योजना लागू व्‍हावी, हीच सर्वांची मागणी आहे. त्‍यामुळे गटतट, विचारधारेतील फरक हे सर्व काही विसरून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्रित यावे, असे आवाहन आमदार किशोर दराडे यांनी केले. आगामी अधिवेशनात जुन्‍या पेन्‍शन योजनेबाबत पाठपुरावा करणार असल्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT