रखडलेल्या वेतनासाठी आंदोलनाचा इशारा
बागलाण, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वरमधील शिक्षकांना प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
जुनी शेमळी, ता. २१ : बागलाण, पेठ, दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील प्राथमिक शिक्षकांचे सप्टेंबरचे वेतन गेल्या १५ दिवसांपासून रखडले आहे. दसरा सण तोंडावर असतानाही वेतन न मिळाल्याने शिक्षकांमध्ये संताप आहे.
दर महिन्याला पाच तारखेच्या आत वेतन जमा न झाल्यास सहा तारखेला आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे यांनी दिला.
चार तालुक्यांतील प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासंदर्भात प्रोत्साहन भत्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता लागू करणे, तर काहींना वगळणे, याबाबत प्रशासनाकडून निर्णय झालेला नाही. तसेच वेतनाची बिले वेळेत सादर होत नसल्याने वेतनाला विलंब होत असल्याचे सांगण्यात आले. अन्य तालुक्यांतील शिक्षकांचे वेतन जमा झाले आहे.
वेतनावर शिक्षकांच्या कुटुंबाचा घरखर्च अवलंबून असतो. मुलांचे शिक्षण, आरोग्यविषयक गरजा आणि इतर खर्चासाठी वेळेत पैसे मिळणे आवश्यक आहे. अनेकांची मुले शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने त्यांना नियमित पैसे पाठवावे लागतात. वेतन रखडल्याने शैक्षणिक खर्चाचे नियोजनही बिघडले आहे. कर्ज आणि एलआयसीचे हप्ते थकल्यास दंडाचा भुर्दंड सहन करावा लागतो. शिक्षक संघटनांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराबाबत शिक्षकांमध्ये नाराजी आहे. दर महिन्याला पाच तारखेच्या आत वेतन जमा करण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सहा तारखेला शिक्षक संघातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेवाळे यांनी दिला.
कोट
शिक्षकांचे वेतन वेळेत अदा करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रोत्साहन भत्त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. वेतनाविना चार तालुक्यांतील शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत वेतन जमा करण्याची व्यवस्था करावी. अन्यथा शिक्षक आंदोलनासाठी सज्ज राहतील.
— संजय शेवाळे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.