नाशिक

शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी मार्गी लावा; अन्यथा आंदोलन

CD
दिवाळीपूर्वी प्रश्न न सुटल्यास शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा नाशिक, ता. ८ : ‘सेंट टू ईओ ऑथरायझेशन’ टॅब बंद झाल्याने जिल्ह्यातील दीडशेहून अधिक शाळांमधील दोन हजारांपेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवाळीपूर्वी प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिला आहे. या प्रश्नासह प्रलंबित मान्यता व समायोजनाच्या विषयांवर परिषदेने शिक्षणाधिकारी सरोज जगताप, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र बोडके व नरेश पाटील यांच्यासोबत सहविचार सभा घेतली. पुणे येथे शिक्षण आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. शिक्षण विभागातील अपुरे मनुष्यबळ आणि एसआयटी चौकशीच्या कामांचा ताण असतानाही वेतनाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी जगताप यांनी दिले. त्यानुसार पोस्ट शिफ्टिंग २० ऑक्टोबरपर्यंत, ग्रंथपाल समायोजन १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे ठरले. प्रयोगशाळा सहाय्यक व अनुकंपा प्रकरणे तातडीने निकाली काढणे, मुख्याध्यापकांना मान्यता देणे तसेच स्वाक्षरी अधिकार तातडीने देऊन वेतन अडकू न देण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीपूर्वी वेतन व मान्यतेचे प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा परिषदेचे विजय बडे यांनी दिला. यावेळी डी. यू. अहिरे, दत्ता वाघे, संजय पाटील, विलास सोनार, अनिल देवरे, गोरख कुनगर, भगवान पानपाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT-JEE प्रमाणे 12वी बोर्ड परीक्षेतही विद्यार्थी कॅल्क्युलेटर नेऊ शकतील का? CBSE आणि केंद्राकडून हायकोर्टाने मागितले उत्तर

IND vs NZ, 2nd Test: दुसऱ्या कसोटीतही सिराज-जडेजाला डच्चू? शुभमन गिलने Playing XI बाबत दिले महत्त्वाचे संकेत

होऊदे खर्च, दाजी हाय सरपंच! २ मेहुण्यांना लग्नात घातली १-१ कोटींची माळ, पाचशेच्या नोटा अन् १०० फूट लांब

Latest Marathi News Live Update : दहिसरमध्ये मोठा अपघात! भरधाव डंपरने महिलेला चिरडले, चालक फरार

Pune Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्गावर आठ पदरी उन्नत मार्ग; निविदा प्रक्रिया पूर्ण, आता कार्यादेशाची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT