Bhishmacharya Firoz Badshah esakal
नाशिक

Firoz Badshah Passed Away : शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य फिरोज बादशाह काळाच्या पडद्याआड

श्री. बादशाह यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शिक्षण क्षेत्रातील भीष्मपितामह म्हणून परिचित असलेले शिक्षक चळवळीतील ज्येष्ठ नेते, अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाचे व महाराष्ट्र ‘टीडीएफ’चे अध्यक्ष फिरोज बादशाह (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मालेगाव हायस्कूलचे शिक्षक शोएब बादशाहा यांचे ते वडील होत.

शहरातील चंदनपुरी गेटवरील बोहरा कब्रस्तानमध्ये रात्री त्यांचा दफनविधी पार पडला. (Behind scenes of Bhishmacharya Firoz Badshah era in field of education nashik news)

श्री. बादशाह यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मालेगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.

१९९२ मध्ये ते निवृत्त झाले. जे. बी. सोनार, माजी आमदार टी. एफ. पवार, फिरोज बादशहा यांना शिक्षक चळवळीतील त्रिदेव म्हणून ओळखले जात होते.

१९७७ मध्ये शिक्षकांना केंद्राप्रमाणे वेतन व भत्ते मिळावे, बँकेतून शिक्षकांचे वेतन व्हावे, यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली ५४ दिवसांचा ऐतिहासिक संप झाला होता. क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती.

फुटबॉलचे ते खेळाडू होते. वाचनाची त्यांना आवड होती. अखेरपर्यंत देशभरातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी ते अहोरात्र झटले. सच्चा व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून शिक्षक त्यांच्याकडे आदराने बघत. त्यांनी शेकडो आंदोलने केली.

सहाव्या वेतन आयोगात केंद्राप्रमाणे वेतनवाढ मिळावी, यासाठी त्यांनी मालेगाव, नाशिक, मुंबई-आझाद मैदान ते दिल्लीतील रामलीला मैदानापर्यंत लढा दिल्याने राज्यातील शिक्षकांना योग्य वेतनवाढ मिळाली. राज्यातील अनेकांना शिक्षक आमदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

SCROLL FOR NEXT