नाशिक

अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात सक्तमजुरीची शिक्षा

CD
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २९ : नांद्रा बुद्रुक (ता.जि. जळगाव) परिसरातील गिरणा नदीपात्रात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हॉट्सॲपवर व्हॉइस क्लीप व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोषारोप सिद्ध झाल्याने आरोपीला ७ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड ठोठावला. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी दिला. नांद्रा बुद्रुक येथील गिरणा नदीपात्रात पवन कैलास सोनवणे (वय १९, रा. नांद्रा बुद्रुक) याने अल्पवयीन पीडितेशी प्रेमसंबंध असल्याचे मोबाईल व इंटरनेट आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल करून समाजात बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला होता. याबाबत पीडितेच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आठ साक्षीदारांच्या साक्ष तपासी अधिकारी गणेश चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षी नोंदविण्यात आल्या. यात पीडिता व फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. चारुलता राजेंद्र बोरसे यांनी काम पाहिले, तर पैरवी अधिकारी म्हणून अमोल पाटील यांनी सहकार्य केले. चौकट न्यायालयाचा निकाल सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी पवन कैलास सोनवणे याला दोषी ठरविले. त्यानुसार आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड ठोठावला, तसेच भादंवि कलम ५०६ अन्वये एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Pune Theft : मार्केटयार्डात डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT