धुळे ः टुडे १ साठी, संक्षिप्त
---
छेडछाड, विनयभंग;
आत्महत्येचा प्रयत्न
धुळे : फागणे (ता. धुळे) येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड व विनयभंग केल्याच्या त्रासाला कंटाळून तिच्या आईने फिनाइल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. ४ ऑक्टोबरला सायंकाळी पाचच्या सुमारास फागणे येथील ३५ वर्षीय पीडित महिला आपल्या १६ वर्षीय मुलीसह घराच्या अंगणात भांडी घासत असताना संशयित आशिष तायडे त्यांच्या घरासमोर येऊन ‘तू माझ्यासोबत संबध ठेव’, असे बोलला. तसेच त्याने शिवीगाळ करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. संशयिताच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने घरातील फिनाइल प्राशन केले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून संशयित आशिष तायडे याच्याविरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.
---
दहशत माजवणारा
संशयित ताब्यात
धुळे : हातात बेकायदेशीररीत्या धारदार कोयता घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरत आरडाओरडा व शिवीगाळ करून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई ७ ऑक्टोबरला रात्री साडेबाराच्या सुमारास अण्णा भाऊ साठेनगरातील फाशीपूल चौक परिसरात केली. साहिल संजय जाधव (वय १९, रा. अण्णा भाऊ साठेनगर, फाशीपूल चौक, धुळे) असे ताब्यात घेतलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. तो हातात धारदार कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने घटनास्थळावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त केला. या प्रकरणी विनोद जाधव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.