टुडे पान ४ मेन फिचर (शहर- जिल्हा कॉमन)
NSK26H33986
जळगाव : रिफ्लेक्शन फाउंडेशनच्या ‘पालक शाळा उपक्रमां’तर्गत किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यासंबंधी नुकत्याच झालेल्या चर्चासत्रात सहभागी फाउंडेशनचे पदाधिकारी, मानसोपचार व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ.
--------
तब्बल १४ टक्के शालेय मुलांमध्ये उच्चस्तरावरील नैराश्य
उपशीर्षक
तातडीने समुपदेशनाची गरज; ‘पालक शाळा उपक्रमा’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३० : अपेक्षांचे ओझे, पालकांची स्वप्ने, गुणांची स्पर्धा असे प्रकार किशोरवयीन मुलांच्या मानसिक तणावाची प्रमुख कारणे ठरत आहेत. रिफ्लेक्शन फाउंडेशनच्या ‘पालक शाळा उपक्रमां’तर्गत नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून तब्बल ७६ टक्के मुलांमध्ये मध्यम स्तरावरील नैराश्य आढळून आले असून १४ टक्के मुलांमधील नैराश्य उच्च स्तरावर आहे.
रिफ्लेक्शन फाउंडेशनच्या ''पालक शाळा उपक्रमा''अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील २६ शाळांमधील तब्बल ४०६१ विद्यार्थ्यांवर केलेल्या व्यापक मानसिक आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल गुरुवारी (ता.२९) जाहीर करण्यात आला. मू. जे. महाविद्यालयात या अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, डॉ.वीणा महाजन व डॉ. प्रदीप जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शिक्षक, मुख्याध्यापक, समुपदेशक, बाल रोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ यांनी या विषयावर मंथन केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. वीणा महाजन यांच्या मानसिक आरोग्य प्रश्नावलीच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला असून, यामध्ये विद्यार्थ्यांच्या चिंता, नैराश्य, ताण आणि भावनिक आरोग्याचे वास्तव मांडण्यात आले आहे. डॉ. वीणा महाजन यांनी सादरीकरण केले.
---------
ही आहेत कारणे
अपेक्षांचे अतिओझे, पालकांची अवास्तव स्वप्ने, गुणांची स्पर्धा, संवादाचा अभाव, सोशल मीडिया व मोबाईलचा अतिवापर आणि पिढीतील अंतर यामुळे विद्यार्थी मानसिक दबावाखाली जगत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
----
डॉ. जोशींनी सुचवला उपाय
ताण कमी करणे म्हणजे अपेक्षा कमी करणे. पालकांबरोबरच शिक्षकांनी देखिल विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा कमी केल्या पाहिजेत. मुलांना मोकळा वेळ देण्याबरोबरच लैगिक शिक्षण देण्याची गरज असल्याचे डॉ. प्रदीप जोशी यांनी आपल्या समारोपात मांडले.
-------
ग्राफ (कृपया एआयचा ग्राफ वापरू नये)
सर्वेक्षणाचे महत्त्वपूर्ण निष्कर्ष
- सुमारे १४.६ टक्के विद्यार्थ्यांमध्ये उच्च नैराश्य
- तब्बल ५१.४ टक्के विद्यार्थ्यांचे भावनिक आरोग्य कमी स्तरावर असून, त्यांना मार्गदर्शनाची गरज
- करिअर तयारीच्या बाबतीत ३३.९ टक्के विद्यार्थ्यांची तयारी कमी स्तरावर
- जवळपास ७६.० टक्के विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य मध्यम स्तरावर
------
(चौकट)
सूचना व शिफारशी
- प्रत्येक माध्यमिक शाळेमध्ये प्रशिक्षित समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञांची नियुक्ती अनिवार्य करावी
- पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा, त्यांच्यातील वर्तनातील बदल ओळखावेत, त्यासाठी विशेष कार्यशाळा घ्याव्यात.
- शाळांमध्ये वर्षातून किमान दोनदा विद्यार्थ्यांची मानसिक आरोग्य तपासणी व जीवनकौशल्य शिक्षण अनिवार्य करावे.
- शिक्षक, पालक, वैद्यकीय तज्ज्ञ आणि पोलिस प्रशासनाने एकत्र येऊन तणावाखालील विद्यार्थ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी एक यंत्रणा उभी करावी
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.