नाशिक

११० किलो वजनाच्या १९ वर्षीय महिलेची सुखरूप प्रसूती करत ३ किलोच्या कन्यारत्नाला जन्म येवला उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने विशेष दक्षता घेत पार पाडली प्रसूती

CD
YEO26B27538 येवला : येथील शस्त्रक्रिया केलेल्या महिलेसोबत वैद्यकीय पथक. -------------- येवला उपजिल्हा रुग्णालयात आव्हानात्मक प्रसूती सुखरूप ------------- वजन ११० किलो, वय १९, अनेक आव्हानांवर यशस्वी मात ------------ सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१६ : प्रसूतीदरम्यान आवश्यक असलेली विशेष वैद्यकीय दक्षता, अचूक नियोजन आणि डॉक्टरांच्या कौशल्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने एक आव्हानात्मक प्रसूती सुखरूप पार पाडली. अवघ्या १९ वर्षांच्या आणि ११० किलो वजनाच्या शालिनी शरद अहिरे या महिलेने २९५० ग्रॅम वजनाच्या गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला आहे. भार्डी- खादगाव (ता. नांदगाव) येथील ही महिला प्रसूतीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. ------------- महिलेचे कमी वय आणि अधिक वजन लक्षात घेता प्रसूतीदरम्यान विशेष काळजी घेणे आवश्यक होते. संभाव्य वैद्यकीय गुंतागुंत टाळण्यासाठी प्रसूतीपूर्व नियोजनापासून ते प्रत्यक्ष प्रसूतीपर्यंत डॉक्टरांनी आवश्यक ती खबरदारी घेतली. योग्य वैद्यकीय उपचार, दक्षता आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमधील समन्वयाच्या माध्यमातून ही प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली. ही प्रसूती डॉ. पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वल्लभ पोकळे, डॉ. गायत्री आमराव, नर्स भाकरे आणि अक्षय कहांडळ यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. माता आणि नवजात बालिका दोघांचीही प्रकृती सुखरूप असल्याने रुग्णालयातील वैद्यकीय पथकाच्या कार्याचे कौतुक होत प्रसूतीपूर्व तपासणी, आवश्यक वैद्यकीय नियोजन आणि प्रसूतीदरम्यान घ्यावयाची काळजी या सर्व बाबींची जबाबदारी वैद्यकीय पथकाने समर्थपणे सांभाळली. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे माता आणि नवजात कन्येची सुखरूप प्रसूती शक्य झाल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti news : सोलापुरात ऊस दरावरून रणकंदन; राजू शेट्टी आक्रमक

Luck Zodiac Signs: पुढचे १२२ दिवस या राशींवर पडणार पैशांचा पाऊस! गुरूच्या वक्री चालीचा मोठा फायदा; नशिबाची दारं उघडणार? तुमची रास कोणती?

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Latest Marathi News Update : सोलापूरनंतर आता 'स्वाभिमानी'चा मोर्चा बारामतीकडे; ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी कारखान्यांना २५ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

SCROLL FOR NEXT